अनिल कुंबळे हे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे खेळाडू आहेत. त्यांनी १३२ कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण १ हजार ५७६ मेडन ओव्हर्स टाकल्या आहेत.
बिशन सिंग बेदी यांनी ६७ कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये एकूण १ हजार ९६ षटके टाकली आहेत. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन षटके टाकण्याच्या बाबतीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकण्याच्या बाबतीत कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी भारतासाठी १३१ कसोटी सामन्यांमध्ये १ हजार ६० मेडन ओव्हर्स टाकल्या आहेत आणि या काळात त्यांनी एकूण ४३४ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकण्याच्या बाबतीत रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने भारतासाठी १०६ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ९०७ मेडन ओव्हर टाकल्या आहेत आणि ५३७ विकेट्स घेतल्या आहेत.
हरभजन सिंगने भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ८७१ मेडन ओव्हर टाकल्या आहेत आणि या काळात त्याने एकूण ४१७ मेडन ओव्हर टाकल्या आहेत. हरभजन हा भारतासाठी कसोटीत हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज आहे.