Join us  

टॉप 10! सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार कोण, तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 7:58 PM

Open in App
1 / 10

अॅलन बोर्डर : ऑस्ट्रेलियाचे माजी विश्वविजेते कर्णधार अॅलन बोर्डर यांनी 178 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. या 178 सामन्यांमध्ये बोर्डर यांनी 4439 धावा केल्या.

2 / 10

ए बी डी'व्हिलियर्स : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए बी डी'व्हिलियर्सने आतापर्यंत 103 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करताना 4796 धावा केल्या आहेत.

3 / 10

विराट कोहली : भारताचा कर्णधार विराट कोहलीने 80 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्न करताना 4800 धावा केल्या आहेत.

4 / 10

सौरव गांगुली : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्न करताना 5104 धावा फटकावल्या होत्या.

5 / 10

मोहम्मद अझरूद्दीन : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 174 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्न करताना 5169 धावा केल्या होत्या.

6 / 10

ग्रॅमी स्मिथ : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद सांभाळले. या 149 सामन्यांमध्ये स्मिथने 5414 धावा केल्या होत्या.

7 / 10

अर्जुना रणतुंगा : श्रीलंकेचे माजी विश्वविजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी संघाचे 11 वर्षे नेतृत्व केले. त्यांनी 193 एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवताना 5608 धावा केल्या.

8 / 10

स्टीफन फ्लेमिंग : न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने 208 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करताना 6295 धावा फटकावल्या आहेत.

9 / 10

महेंद्रसिंग धोनी : भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रिसिंग धोनीने 200 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची धुरा सांभाळली. या 200 सामन्यांमध्ये धोनीने 6641 धावा केल्या.

10 / 10

रिकी पॉन्टिंग : ऑस्ट्रेलियाला दोनवेळा विश्वचषक जिंकवून देणारा रिकी पॉन्टिंग या यादीत अव्वल स्थानावर आहे. कारण रिकी पॉन्टिंगने 230 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना 8497 धावा केल्या आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीविराट कोहलीसौरभ गांगुली