सर्वाधिक कसोटी विजय - भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०१४ ते २०२२ या कालावधीत एकूण ६८ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आणि त्यांपैकी एकूण ४० सामन्यात विजय मिळवला आहे, तर १७ सामने अनिर्णित राहिले आहेत. कोहली वगळता, इतर कुठल्याही भारतीय कर्णधाराला ३० कसोटी सामनेही जिंकता आलेले नाहीत. या बाबतीत एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६० पैकी २७ कसोटी सामने जिंकले आहेत.