MS धोनीसाठी CSK नं शेअर केली खास पोस्ट, जाणून घ्या त्यामागची गोष्ट

MS धोनीसाठी CSK नं शेअर केली खास पोस्ट, जाणून घ्या त्यामागची खास गोष्ट

MS धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात एक खास बॉन्डिंग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी या फ्रँचायझी संघाच्या माध्यमातून क्रिकेटशी कनेक्टेड आहे.

मेगा लिलावाआधी CSK नं आगामी हंगामासाठी MS धोनीला अनकॅप्ड गटातून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्यामुळे आगामी हंगामातही धोनीची क्रेझ पाहायला मिळणार आहे.

२३ डिसेंबर हा दिवस धोनीसाठी अन् त्याच्या चाहत्यांसाठी एकदम खास आहे. कारण धोनीनं याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याच गोष्टीच्या आठवणीला उजाला देत CSK च्या संघानं थालाचा २० वर्षांचा प्रवास दाखवण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केलीये.

CSK नं जो फोटो शेअर केलाय त्यात धोनीची टीम इंडिया आणि CSK च्या जर्सीतील छबी आणि ट्रेनची झलक पाहायला मिळते. या एका फोटोत धोनीचा तिकीट कलेक्टर टू ट्रॉफी कलेक्टर हा प्रवास दडलेला आहे.

२३ डिसेंबर २०२४ मध्ये धोनीनं बांगलादेश विरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. चटगांवच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात धोनी रन आउट झाला होता.

पदार्पपणाच्या सामन्यात अडखळत खेळणाऱ्या धोनीनं पुढच्या काही सामन्यात खास छाप सोडत आधी संघातील जागा पक्की केली. मग संघाच्या नेतृत्वाची माळ त्याच्या गळ्यात पडली. कॅप्टन कूल धोनीच्या नावे आयसीसीच्या सर्वच्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा विक्रमही आहे.

कॅप्टन्सीशिवाय फिनिशरच्या रुपात त्याने क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवल्याचेही पाहायला मिळाले.

धोनीसारखा खेळाडू कधीच निवृत्त होऊ नये, अशीच चाहत्यांची इच्छा असते. पण प्रत्येक खेळाडूवर ती वेळ येतेच. तशी धोनीवरही आली.

आंतरारष्ट्रीय कारकिर्दीची जशी सुरुवात केली अगदी तसाच शेवट त्याच्या वाट्याला आला. २०१९ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत तो रन आउटच्या रुपात बाद झाला होता. ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अखेरची मॅच ठरली.

तो आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून थांबला असला तरी अजूनही IPL च्या मैदानात त्याचा जलवा पाहायला मिळत आहे. यावेळी पुन्हा चाहते त्याच्यासाठी स्टेडियममध्ये तुडूंब गर्दी करतानाचा माहोल दिसला तर नवल वाटणार नाही.