शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत श्रीलंकेवर दोन विकेट्सनी मात करत बांगलादेशने निदहास करंडक तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
तत्पूर्वी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना कुशल परेरा (61) आणि थिसारा परेरा (57) यांनी केलेल्या 97 धावांच्या भागीदारीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 159 धावा फटकावत बांगलादेशसमोर विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले.
त्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून बांगलादेशचा डाव अडचणीत आणला.
अखेर शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाने षटकार ठोकत बांगलादेशला विजय मिळवून दिला.