Join us

या तीन क्रिकेटपटूंवर बनवले चित्रपट आता यांचा नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 21:40 IST

Open in App
1 / 7

भारताचा माजी कर्णधार महंमद अझरुद्दीनच्या आयुष्यवर बनवण्यात आला आहे. या चित्रपटात अझरच्या क्रिकेटमधील जीवनाबरोबरच त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही बरेच काही सांगण्यात आले होते. महंमद अझरउद्दीनने भारतासाठी ९९ कसोटी तर ३३४ वनडे सामने खेळले आहेत.

2 / 7

भारताचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर आलेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. एम. एस. धोनी : दि अनटोल्ड स्टोरी या चित्रपट धोनीचा टिकिट कलेक्टर ते भारताचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार हा अविस्मरणी प्रवास दाखवण्यात आला आहे.

3 / 7

क्रिकेटचा आराध्य दैवत मानला जाणारा सचिन रमेश तेंडुलकरच्या जीवनावर २०१७ मध्ये चित्रपट बनवण्यात आला. हा एका सामान्य बॉलीवूड चित्रपटाप्रमाणे नसून एखाद्या डोकमेंटरी प्रमाणे होता. सचिन तेंडुलकरचे बालपण कसे गेले ते त्याचे भारतीय संघाबरोबरचे सर्व चांगले वाईट अनुभव या चित्रपटात दाखवण्यात आले.

4 / 7

कपिल देव - भारतीय क्रीडा क्षेत्राला कलाटणी देणारा १९८३ क्रिकेट विश्वचषकावर आधारीत चित्रपटाची बुधवारी मुंबईत घोषणा झाली. आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देवची भूमिका निभावणार आहे.

5 / 7

युवराज सिंग - क्रिकेटर युवराज सिंगची ओळख एक लढवय्या योध्दा म्हणून केली जाते. तो केवळ धडाकेबाज खेळाडूच नाही तर त्याने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दिलेली लढतही तितकीच निकराची होती. ही गोष्ट लोकांसाठी प्रेरणा देणारी आहे.

6 / 7

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजवर लवकरच चित्रपट बनणार आहे. मितालीच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचे सर्व हक्क Viacom18 Motion Pictures ने विकत घेतले आहे.

7 / 7

भारतीय महिला संघातील वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीवर चित्रपट बनवण्याची घोषणा झाली आहे

टॅग्स :क्रिकेट