Join us

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी वर्षभरात तीन देश फिरतो; जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 16:34 IST

Open in App
1 / 7

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली. तो इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अजूनही खेळतोय अन् IPL 2023 ही त्याची खेळाडू म्हणून कारकीर्दितील अखेरची स्पर्धा असण्याची शक्यता आहे.

2 / 7

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर धोनी कुटूंबीयांना बराच वेळ देतोय. कधी तो शिमला, कधी दुबई अशा विविध ठिकाणी फिरताना दिसतोय. आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार आयपीएल वगळल्यास अन्य वेळी काय करतो, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

3 / 7

धोनी आता आयपीएल २०२३ च्या तयारीत व्यस्त आहे. यासाठी त्याने आपल्या शहर रांची येथे प्रशिक्षणही सुरू केले आहे. आजकाल धोनी रांचीमध्ये नेटमध्ये जोरदार फलंदाजी करत आहे आणि त्याने फक्त फिरकीपटूंविरुद्ध सराव केला.

4 / 7

चेन्नई सुपर किंग्ज मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सराव शिबिर सुरू करू शकतो, असे मानले जात आहे. आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीनंतर धोनी पुन्हा एकदा आपल्या संघाला शीर्षस्थानी घेऊन जायला आवडेल.

5 / 7

क्रिकेटच्या मैदानाबाहेर राहिल्यानंतर धोनी वर्षातून एकदाच आयपीएलदरम्यान फलंदाजी आणि कर्णधार करताना दिसतो. अशा परिस्थितीत धोनीच्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर तो प्रत्येकी एक महिना अमेरिका, यूके आणि दुबईमध्ये त्याच्या मित्रांसोबत घालवतो.

6 / 7

याशिवाय तीन ते चार महिने आयपीएलमध्ये जातात. कारण या काळात केवळ स्पर्धेचा वेळच नाही तर ब्रँडिंग आणि प्रशिक्षणातही बराच वेळ जातो.

7 / 7

याशिवाय रांचीमध्ये त्याच्या पालकांसोबत जो काही वेळ असेल तो घालवायला त्याला आवडते. कारण क्रिकेट खेळताना जास्तीत जास्त प्रवासामुळे तो घरापासून दूर असायचा. यामुळेच त्याला उर्वरित वेळ कुटुंबासोबत रांचीमध्ये घालवायला आवडते.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीट्रॅव्हल टिप्स
Open in App