Join us  

भारतीय खेळाडूंचंही कोरोना लढ्यात मोठं योगदान; सचिन, विराट यांच्यासह अनेकांनी लावला हातभार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 7:38 PM

Open in App
1 / 15

कोरोनावर मात केल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प करणाऱ्या महान फलंदाज सचिन तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली होती.

2 / 15

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला होता. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत 3 कोटींची होती.

3 / 15

चेन्नई सुपर किंग्सचा व भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं 52 लाखांची मदत केली होती. यापैकी 31 लाख हे पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर 21 लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले गेले.

4 / 15

टीम इंडियाचा कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 10 लाखांची मदत केली होती.

5 / 15

भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरनं त्याच्या फंडातून 1 कोटींची मदत दिल्ली सरकारला केली होती. शिवाय दोन वर्षांचा पगारही त्यानं दान केला आहे. त्याव्यतिरिक्त दिल्लीतील गरजूंना तो एक रुपयात जेवण देत आहे.

6 / 15

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं 50 लाख रुपयांचे तांदुळ गरजूंना दान केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या संलग्न संघटनांसह मिळून 51 कोटींची मदत केली होती.

7 / 15

मुंबई क्रिकेट असोसिएशननं राज्य सरकारला 50 लाखांची मदत केली. शिवाय बीसीसीआयच्या फंडातही 50 लाख दिले होते.

8 / 15

रोहित शर्मानं पंतप्रधान सहाय्यता निधीत 45 लाखांची मदत केली. शिवाय त्यानं महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख रुपये दिले. याशिवाय Zomato Feeding India आणि भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणाऱ्या WelfareOfStrayDogs. संस्थेला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. रोहितनं एकूण 80 लाखांची मदत केली.

9 / 15

इरफान व यूसुफ या पठाण बंधूंनी गरजूंना अन्न धान्य पुरवण्याचं काम केलं होतं.

10 / 15

शिखर धवन, शेल्डन जॅक्सन, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग यांनीही त्यांच्यापरीनं मदत केली होती.

11 / 15

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिनं १० लाखांची मदत केली होती.

12 / 15

महान खेळाडू सुनील गावस्कर यांनीही ५९ लाखांची मदत केली होती

13 / 15

महेंद्रसिंग धोनीनंही हातावर पोट असलेल्या मजूरांसाठी मदत केली, परंतु ती रक्कम जाहीर केली नाही.

14 / 15

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 5 लाख दिले होते. सुपर मॉम बॉक्सर मेरी कोमनं तिचा एका महिन्याचा पगार आणि खासदार फंडातून 1 कोटींची मदत केली होती.

15 / 15

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानं त्याचा सहा महिन्याचा पगार दिला होता. 16 वर्षीय भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोषऩं 1 लाखांची मदत केली. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं उभ्या केलेल्या चळवळीतून 1.25 कोटी जमा झाले होते. गोल्डन गर्ल हिमा दासनं तिचा एका महिन्याचा पगार दिला होता.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासचिन तेंडुलकरविराट कोहलीसुनील गावसकरगौतम गंभीरशिखर धवनरोहित शर्मामहेंद्रसिंग धोनी