मुंबई : आयपीएलच्या दहाव्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनिल नरेनने १५ चेंडूमध्ये अर्धशतक बनवले होते.
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू केरॉन पोलार्ड याने आयपीएलच्या ९ व्या सत्रात१७ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते.
२०१५ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेल याने १९ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या होत्या.
स्फोटक फंलदाज क्रिस गेलने २०१३ मध्ये १७ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने १७ षटकार आणि १३ चौकार मारत १७५ धावा कुटल्या होत्या.
युसूफ पठाणने आयपीएलच्या सहाव्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना १५ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या होत्या.