Cricketers Who Married Anchors: हे पाच क्रिकेटपटू पडले स्पोर्ट्स अँकरच्या प्रेमात, केला विवाह, यादीत दोन भारतीय खेळाडू

Cricketers Who Married Sports Anchors: आजच्या काळात क्रिकेटपटूंच्या पत्नीसुद्धा सेलिब्रिटी बनल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ५ क्रिकेटपटूंच्या पत्नींबाबत सांगणार आहोत. त्या स्पोर्ट्स अँकरिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. तसेच फॅन्समध्येही खूप लोकप्रिय आहेत.

आजच्या काळात क्रिकेटपटूंच्या पत्नीसुद्धा सेलिब्रिटी बनल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा ५ क्रिकेटपटूंच्या पत्नींबाबत सांगणार आहोत. त्या स्पोर्ट्स अँकरिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. तसेच फॅन्समध्येही खूप लोकप्रिय आहेत.

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू मार्टिन गप्टिलने २०१४ मध्ये गर्लफ्रेंड लॉरा मॅकगोल्ड्रिक हिच्यासोबत लग्न केलं होतं. ती स्काय स्पोर्ट्स चॅनलसाठी अँकरिंग करते. या जोडप्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार ऑलराऊंडर शेन वॉटसनने २०१० मध्ये ली फर्लोंग हिच्याशी विवाह केला होता. ती स्पोर्ट्स प्रेझेंटर, लेखक, मॉडेल आणि बिझनेसवुमन आहे. शेन वॉटसन आणि ली फर्लोग यांना दोन मुलं आहे.

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याने प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर हिच्याशी २०१२ मध्ये विवाह केला होत. २०२० मध्ये त्यांना पुत्ररत्न झाले. स्टुअर्ट बिन्नीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास काही कमाल करता आली नाही. मात्र मयंती लँगर भारतातील लोकप्रिय महिला अँकर बनली आहे.

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हीसुद्धा एक प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी २०२१ मध्ये विवाह केला होता. संजनाने २०१९ च्या विश्वचषकामध्ये काही प्रसिद्ध शोचं अँकरिंग केलं होतं.

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्कल याने डिसेंबर २०१४ मध्ये गर्लफ्रेंड रोज केली हिच्याशी विवाह केला होता. रोज प्रसिद्ध अँकर आहे. ती चॅनल ९ मध्ये कार्यरत आहे.