Join us

T20World Cup 2022 : बॉयफ्रेंडला वर्ल्ड कप संघातून बाहेर काढल्याचा राग, क्रिकेट संघटनेला तिने विचारला जाब!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:03 IST

Open in App
1 / 6

वेस्ट इंडिजने बुधवारी शिमरोन हेटमायर ( Shimron Hetmyer) याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातून बाहेर काढले. विंडीजचा संघ ऑस्ट्रेलियात ज्या विमानानं जाणार होतं, ते पकडण्यासाठी हेटमायर वेळेत पोहोचू शकला नाही आणि त्यामुळे त्याला संघाबाहेर केले गेले. सोशल मीडियावर सध्या हाच विषय चर्चेचा ठरतोय. त्यात हेटमायरची गर्लफ्रेंड निरवानी हेटमायरने विंडीज क्रिकेट बोर्डाशी पंगा घेतला.

2 / 6

'सीडब्ल्यूआय निवड समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हेटमायरनं ऑस्ट्रेलियासाठी आपलं रिशेड्युल केलेलं विमान चुकवलं. काही कारणास्तव त्यानं वेळ बदलली होती,' असं क्रिकेट बोर्डानं म्हटलं.

3 / 6

हेटमायरला प्रथमच संघातून वगळले गेलेले नाही. याआधीही तंदुरुस्तीच्या कारणास्तव त्याला संघाबाहेर बसवले गेले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची अनुपस्थिती विंडीजला खूप महागात पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात त्याची प्रचिती आली. विंडीजला १४५ धावा करता आल्या आहेत.

4 / 6

शिमरोन हेटमायरच्या जागी वर्ल्ड कप संघात शामार्ह ब्रूक्सची निवड केली गेली आहे. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली विंडीजचा संघ पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आहे. दोन वेळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या विंडीजचा पहिला सामना पात्रता स्पर्धेत १० ऑक्टोबरला यूएईविरुद्ध आहे.

5 / 6

वेस्ट इंडिजचा संघ - निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, यानिक चारियाह, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कोट्रेल, जेसन होल्डर, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, एव्हिन लुईस, कायले मेयर्स, ओबेड मॅकॉय, रेयमन रैफर, ओडीन स्मिथ, शामार्ह ब्रुक्स.

6 / 6

निरवानीने इंस्टास्टोरीत पोस्ट केलेली इमेज हेटमायरने स्वतःच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केली आहे. त्यात निरवानीने बॉयफ्रेंडला पाठिंबा दर्शवला आहे. तिने लिहिले की, नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशाच प्रत्येक कथेची दुसरी बाजू असते. शिमरोन माझा तुला नेहमी पाठिंबा असेल. खूप खूप प्रेम.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2वेस्ट इंडिज
Open in App