Join us  

IND vs BAN : रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यास ३ खेळाडू ओपनर म्हणून आहेत शर्यतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 2:39 PM

Open in App
1 / 8

ढाका येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान अंगठ्याला दुखापत झाल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. रोहित दुसऱ्या स्लिपमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, पण तो पूर्ण करू शकला नाही आणि प्रक्रियेत त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली.

2 / 8

दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दुखापत झाल्यानंतर तो क्षेत्ररक्षण करू शकला नाही आणि फक्त नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा करून भारताला सामना जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ते सर्व निष्फळ ठरले आणि भारताने पाच धावांनी सामना गमावला.

3 / 8

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सलग पराभवामुळे रोहितचा भारतीय कर्णधार म्हणून पहिला द्विपक्षीय वनडे मालिका पराभव झाला. सामन्यांनतर, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित तिसऱ्या सामन्यातून बाहेर आहे आणि त्याच्या अंगठ्याच्या दुखापतीबद्दल तज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी तो मुंबईला जाणार आहे, असे सांगितले.

4 / 8

रोहितने की त्याला काही टाके पडले आहेत. दुखापतीची व्याप्ती अद्याप पूर्णपणे कळू शकलेली नाही. १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तो वेळेत तंदुरुस्त होईल अशी आशा व्यक्त केली जात असताना, कोणीही निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही.

5 / 8

चट्टोग्राममधील पहिल्या कसोटीसाठी रोहित पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्यास भारत दुसर्‍या ओपनिंग कॉम्बिनेशनकडे वळू शकतो. संघात शुभमन गिल आणि लोकेश राहुलची उपस्थिती असूनही, बीसीसीआय कसोटी मालिकेसाठी बांगलादेशला एक अतिरिक्त सलामीवीर पाठवण्याचा विचार करू शकते.

6 / 8

मयांक अग्रवालने भारतासाठी एकूण २१ कसोटी खेळल्या आहेत, ज्यात त्याने ४१.३३ च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड झालेली नाही पण रोहितला वगळले गेल्यास त्याच्या जागी तो प्रमुख दावेदार असेल. कर्नाटकच्या फलंदाजाने आधीच २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर २५७ धावा आहेत.

7 / 8

बंगालचा फलंदाज आणि सध्याच्या बांगलादेश अ दौऱ्यासाठी भारत अ संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रांगेत असतील. २७ वर्षीय उजव्या हाताचा सलामीवीर सध्या सुरू असलेल्या ए मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने बॅक टू बॅक शतके ठोकली आहेत. पहिल्या सामन्यात त्याने १४१ धावांची खेळी केली आणि दुसऱ्या सामन्यात तो १५१ धावांवर बाद झाला.

8 / 8

यशस्‍वी जैस्वालची शक्यता फार कमी असली तरी त्याला संधी मिळण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. २० वर्षीय यशस्वी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याने या हंगामात प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खूप धावा केल्या आहेत. तो बांगलादेशातील भारताच्या अ संघाचा देखील भाग आहे आणि बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या अ सामन्यात त्याने १४६ धावा केल्या होत्या.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्मामयांक अग्रवाल
Open in App