माजी क्रिकेटर सना मीर (Sana Mir) पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर आहे. सना मीरने पाकिस्तानी टीमचं जवळपास १५ वर्ष नेतृत्व केले होते. महिला क्रिकेटच्या इतिहासात या पाकिस्तानी खेळाडूचं नाव खूप प्रसिद्ध होते.
२०२० मध्ये सना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली. निवृत्तीनंतर सना मीरने कमेंटेटर आणि रिप्रेंसटर म्हणून काम केले आहे. पाकिस्तानकडून खेळता खेळता सना मीर पाकिस्तानची सर्वात श्रीमंत महिला खेळाडू बनली आहे.
पाकिस्तानची माजी क्रिकेटर सना मीर आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कपच्या क्वालीफायर्स २०२४ मध्ये या टूर्नामेंटसाठी ब्रँड एंबेसडर बनली होती. वर्ल्ड क्रिकेटमध्येही सना मीरचे नाव प्रसिद्ध आहे. सना मीर १.२ मिलियन डॉलरची मालकिण आहे. भारतीय चलनात ही रक्कम १०.६५ कोटी इतकी आहे तर पाकिस्तानी चलनात ही रक्कम ३३.७१ कोटी पाकिस्तानी रुपये आहे.
सना मीरने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीत एकूण १२० सामने खेळले, ज्यामध्ये तिने १५१ विकेट्स घेतल्या. सना मीरने मे २००९ मध्ये तिच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने ऑक्टोबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
तिच्या टी-२० कारकिर्दीत, सना मीरने १०६ सामन्यांमध्ये ८९ विकेट्स घेतल्या आहेत. १२० एकदिवसीय सामन्यांच्या ११० डावांमध्ये १७.९१ च्या सरासरीने १,६३० धावा केल्या आहेत. तिने १०६ टी-२० सामन्यांच्या ८१ डावांमध्ये ८०२ धावा केल्या आहेत. तिने तिच्या फलंदाजी कारकिर्दीत तीन अर्धशतके झळकावली आहेत.
सना मीर ही पाकिस्तानच्या महिलांच्या क्रिकेट संघात ऑल-राउंडर म्हणून खेळायची. ती काश्मिरी वंशाची असून तिचे वडील मीर मोताझीद हे पाकिस्तान आर्मीचे कर्नल होते. लहानपणापासूनच ती विविध कॅंटोनमेंट्समध्ये राहिली, ज्यामुळे तिला देशभरातील विविध संस्कृतींचा अनुभव आला.
सना मीरने तिचे प्राथमिक शिक्षण रावळपिंडी येथे घेतले. नंतर तिने गुजरानवाला कॅंटोनमेंटमध्ये काही काळ अभ्यास केला. कुटुंबासोबत कराचीला गेल्यावर तिने बारावी शिक्षण पूर्ण केले. तिने स्टॅटिस्टिक्स आणि गणित या विषयात पदवी प्राप्त केली. बारावीनंतर तिला नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (एनयूएसटी) मध्ये इंजिनीअरिंगसाठी प्रवेश मिळाला होता, पण क्रिकेटमुळे ती पदवी पूर्ण करू शकली नाही.
सना मीरने २००५ मध्ये श्रीलंकेसविरुद्ध वनडे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि २००९ मध्ये आयर्लंडविरुद्ध टी-२० पदार्पण केले. तिने १२० वनडे आणि १०६ टी-२० सामन्यात खेळली, ज्यात १६३० धावा आणि २४० बळी घेतले. ती पाकिस्तानची पहिली महिला खेळाडू ठरली जिने वनडे क्रिकेटमध्ये १०० हून बळी घेतले. २००९ ते २०१७ पर्यंत तिने १३७ सामन्यांत कर्णधारपद भूषवले.
२०१८ मध्ये सना मीर आयसीसी वनडे बॉलर रँकिंगमध्ये नंबर १ झाली. तिच्या नेतृत्वात पाकिस्तानचा रँकिंग सुधारला आणि अनेक खेळाडूंची आंतरराष्ट्रीय ओळख झाली. २०२० मध्ये तिने निवृत्ती घेतली, पण २०२२ मध्ये फेअरब्रेक इन्व्हिटेशनल टी-२० मध्ये तात्पुरते पुनरागमन केले.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये २०२५ मध्ये समाविष्ट झालेली पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटर आहे. लिंग समानता, युवा सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य जागृतीसाठी ती टेड टॉक्स, युनायटेड नेशन्स मोहिमा आणि विविध प्लॅटफॉर्मवर काम करते.ती पाकिस्तानमधील महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.