सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या सामन्यावेळी निळं टी शर्ट आणि पांढरा स्कर्ट्स परिधान केलेल्या एका तरुणीचे फोटो खूप व्हायरल झाले होते. काही जणांनी ती एआय मॉडेल असल्याचा तर काही जणांनी हे फोटो एडिट केलेले असल्याचा दावा केला होता. आता या तरुणीचे आणखी फोटो समोर आले असून, ते आयरा रावत या सोशल मीडिया प्रोफाईलवरून शेअर करण्यात आले आहेत.
आयरा हिच्या अकाउंटच्या बायोमध्ये फॅशन ड्रीमर, स्टाईल अँड सोल असं लिहिलेलं आहे. आता ही प्रोफाईल खरी आहे की, एआय द्वारे तयार केलेली आहे हे समजू शकलेलं नाही. मात्र या प्रोफाईलवरील तरुणीचे स्टायलिश फोटो नेटीझन्सचं लक्ष वेधून घेत आहेत.
यातील एका फोटोमध्ये आयरा लाईट पिंक कलरची फ्लोरल प्रिंट साडी नेसलेली दिसत आहे. तसेच सिंपल मेकअपमुळे तिचं सौंदर्य आणखीनच खुललेलं दिसत आहे.
दुसऱ्या एका फोटोमध्ये आयरा ही मस्टर्ड यलो कुर्ता परिधान करून स्टायलिश लूक देताना दिसत आहे. तिने ड्रेससोबत तिने छोटीशी बिंदीसुद्धा लावलेली आहे.
या पोटोमध्ये आयरा हिने कॅज्युअल लूकमध्ये नो स्लीव्हलेस प्रिंटेड टॉप परिधान केला आहे. तसेच तिने हातावर मेहंदी काढलेली आहे. तिचा हा लूकसुद्धा खूप यूथफूल आणि व्हायब्रंट दिसत आहे.
या फोटोत आयराने पेस्टल पिंक साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे. तसेच त्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
या फोटोत आयरा ही परफेक्ट फेस्टिव्ह वेडिंग लूकमध्ये दिसत आहे. तिने हेवी एब्रॉयडरी असलेला ब्लाऊज आणि मॅचिंग लेहंगा परिधान केला आहे. तसेच सटल मेकअप आणि बिंदीमुळे तिचा लूक आणखीच खुलला आहे.
तर या फोटोत आयरा हिने मरून शॉर्ट कुर्ता आणि डेनिममध्ये तिने इंडो-वेस्टर्न फ्युजनचं सुंदर कॉम्बिनेशन साधलं आहे.