WPL Auction 2023 Live : महिलांचेच राज्य! मुंबईची 'मलिका' ऑक्शनरच्या भूमिकेत दिसणार; जाणून घ्या तिच्याबद्दल

Women’s Premier League 2023 auction Live : पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

पहिल्या वहिल्या महिला प्रीमिअर लीग २०२३ साठी आज मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलावासाठी BCCI ने महिला ऑक्शनरची ( female auctioneer ) ची निवड केली गेली आहे. मलिका सागर अडवाणी ( Malika Sagar Advani) असे तिचे नाव आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत रिचर्ड मॅडले, ह्यू अॅडम्स यांच्याशिवाय चारू शर्मा यांनी ऑक्शनरची जबाबदारी पार पाडली आहे. महिला प्रीमियर लीगसाठी महिला ऑक्शनरची निवड करून BCCIने आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले आहे.

WPL च्या लिलावात केवळ ९० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. प्रत्येक संघाला १८ खेळाडूंचीच निवड करता येणार आहे, १५० खेळाडूंचा एक संच असणार आहे. ५०, ४० व २० लाख अशा तीन बेस प्राईज ( मुळ किंमत) ठेवण्यात आल्या आहेत. अनकॅप्ड खेळाडूसाठी १० ते २० लाखांची बेस प्राईज ठेवली जाईल. प्रत्येक फ्रँचायझीच्या पर्सची मर्यादा १२ कोटी ठेवण्यात आली आहे

एकूण ४०९ क्रिकेटपटूवर महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये बोली लावली जाणार आहे. लिलावासाठी एकूण १५२५ खेळाडूंनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी ४०९ खेळाडूंची निवड केली गेली. यामध्ये २४६ भारतीय आणि १६३ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, ज्यात संलग्न संघटनेचे ८ खेळाडूही आहेत.

महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स अशी संघांची नावं ठरवली गेली आहेत.

मलिका अडवाणी ही मुळची मुंबईची... मलिका Art Collector व consultant for Modern and Contemporary Indian art म्हणून काम करते. याआधी तिनने अनेक आर्ट गॅलरीमध्ये ऑक्शनरची जबाबदारी पार पाडली आहे. याआधी तिने प्रो-कबड्डीच्या २०२१ च्या लिलावातही Auctioneer ची भूमिका पार पाडली होती. आयपीएलच्या इतिहासात गेली १५ वर्ष रिचर्ड मेडली आणि ह्यू एडमेडेस यांनी Auctioneer म्हणून काम केलं आहे.