भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराह सध्या इंग्लंड दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वाधिक काळ पहिल्या क्रमांकावर राहणारा गोलंदाज राहण्याचा विक्रम डेल स्टेनच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज स्टेन २ हजार ३४३ दिवस अव्वल स्थानावर राहिला. त्याने त्याच्या कारकिर्दीत ९३ कसोटी सामन्यांमध्ये ४३९ विकेट्स घेतले.
या यादीत वेस्ट इंडिजचा माजी धोकादायक गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस दुसऱ्या स्थानावर आहे. अॅम्ब्रोस १ हजार ७१९ दिवस आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला. त्याने ९८ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ४०५ विकेट्स घेतले.
श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन १ हजार ७११ दिवस आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिला. त्याने त्याच्या कारकिर्दीत १३३ कसोटी सामन्यांमध्ये ८०० विकेट्स घेतले. तो कसोटी इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स चौथ्या क्रमांकावर आहे. तो १ हजार ३१३ दिवसांपासून कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराने सध्या ७१ कसोटी सामन्यांमध्ये ३०९ विकेट्स घेतले आहेत.
कमिन्सचा सहकारी ग्लेन मॅकग्रा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मॅकग्रा १ हजार ३०६ दिवस आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. त्याने १२४ कसोटी सामन्यांमध्ये ५६३ विकेट्स घेतले.