IPL च्या इतिहासात सर्वात जलद चेंडू टाकणारा गोलंदाज कोण? आघाडीच्या १० गोलंदाजांमध्ये २ भारतीय

टॉप ५ मध्ये एका भारतीयाने दोन वेळा नोंदवलं आपलं नाव

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जलद चेंडू फेकण्याचा रेकॉर्ड आजही ऑस्ट्रेलियन शॉन टेटच्या नावे आहे. २०११ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना या जलदगती गोलंदाजाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात ताशी १५७.१ किमी वेगाने चेंडू फेकला होता.

न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसन याने २०२२ च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून खेळताना ताशी १५७.३ किमी वेगाने चेंडू फेकल्याचे पाहायला मिळाले होते.

भारताचा उमरान मलिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. २०२२ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळताना दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ताशी १५७ किमी वेगाने चेंडू टाकल्याचा रेकॉर्ड आहे.

लखनौच्या ताफ्यातील मयंक यादवनं २०२४ च्या हंगामात आपल्या वेगाने सर्वांना थक्क केल्याचे पाहायला मिळाले. LSG कडून आयपीएल पदार्पणातच त्याने RCB विरुद्ध ताशी १५६.७ किमी वेगाने चेंडू टाकला होता.

या यादीत पाचव्या क्रमांकावरही मयंक यादवच नाव आहे. २०२४ च्या हंगामातच त्याने ताशी १५५.८ वेगाने चेंडू टाकला होता.

दक्षिण आफ्रिकेच्या ॲनरिक नॉर्तजे याने २०२० च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध ताशी १५६.२२ किमी वेगाने चेंडू टाकला होता.

२०२० च्या हंगामातच ॲनरिक नॉर्तजे याने ताशी १५५.१ किमी वेगाने मारा केल्तायाचे पाहायला मिळाले होते

दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगती गोलंदाज डेल स्टेन या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. २०१२ डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधीत्व करताना त्याने ताशी १५४.४ किमी वेगाने सर्वांचे लक्षवेधून घेतले होते.

दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा याने २०१९ च्या हंगामात पंजाबकडून खेळताना ताशी १५४.२३ किमी वेगाने चेंडू फेकल्याचा रेकॉर्ड आहे.