Join us  

Team-wise match fees : भारतीय खेळाडूंना मिळते सर्वाधिक मॅच फी?, उत्तर जाणून तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:58 AM

Open in App
1 / 8

इंग्लंड ( England) - इंग्लंडच्या खेळाडूंना सर्वाधिक 18.5 लाख रुपये प्रती कसोटी सामन्याला दिली जाते. वन डे व ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यासाठी अनुक्रमे 10 व 5.1 लाख रुपये मॅच फी दिली जाते.

2 / 8

ऑस्ट्रेलिया ( Australia ) - ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना एका कसोटी सामन्यासाठी 11 लाख मॅच फी दिली जाते. वन डे क्रिकेटसाठी 8.5 लाख, तर ट्वेंटी-20साठी 5.6 लाख दिले जातात.

3 / 8

पाकिस्तान ( Pakistan) - पाकिस्तानी खेळाडूंना एका कसोटीसाठी 3.6 लाख रुपये दिले जातात. वन डे व ट्वेंटी-20 साठी प्रती सामना अनुक्रमे 2.2 लाख व 1.6 लाख मॅच फी त्यांना मिळते.

4 / 8

बांगलादेश (Bangladesh) - कसोटी सामन्यासाठी 2.6 लाख रुपये मॅच फी, वन डे व ट्वेंटी-20 सामन्यासाठी अनुक्रमे 1.7 लाख व 1 लाख मॅच फी..

5 / 8

दक्षिण आफ्रिका ( South Africa) - क्रिकेट दक्षिण आफ्रिका एका कसोटीसाठी खेळाडूंना 3.3 लाख मॅच फी देतात. वन डेसाठी 87 हजार आणि ट्वेंटी-20 साठी 58 हजार मॅच फी

6 / 8

न्यूझीलंड ( New Zealand) - न्यूझीलंडच्या खेळाडूंना एका कसोटीसाठी 4.5 लाख रुपये मॅच फी दिली जाते. वन डे व ट्वेंटी-20साठी एका सामन्याला त्यांना अनुक्रमे 2 लाख व 1.3 लाख मिळतात.

7 / 8

श्रीलंका ( Sri Lanka) - श्रीलंकेचे खेळाडू सध्या करारावरून अडून बसले आहेत आणि करारावर स्वाक्षरी न करताच ते इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांना एका कसोटीसाठी 5.5 लाख रुपये मॅच फी मिळते. वन डे व ट्वेंटी-20साठी अनुक्रमे 1.5 लाख व 2.5 लाख मिळतात.

8 / 8

भारत ( India) - एका कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूला 15 लाख, वन डे साठी 6 लाख आणि ट्वेंटी-20 साठी 3 लाख मॅच फी दिली जाते.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयइंग्लंड