महेंद्रसिंग धोनी म्हणजे जागतिक क्रिकेटमधील एक मोठे नाव... धोनीचे लाखो, करोडो चाहते आहेत. आता या यादीत रवींद्र जडेजाही सामील झाला आहे. खरं तर क्रिकेटपटू जडेजा चाहत्याच्या भूमिकेत माजी भारतीय कर्णधाराच्या रांची येथील फार्महाऊसवर पोहोचला.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचा भाग असलेल्या जड्डूला धोनीचा जवळचा सहकारी मानले जाते. धोनीच्या नेतृत्वात मागील अनेक वर्ष जडेजा खेळत आहे.
भारतीय संघाने रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला. भारताने हा सामना जिंकून इंग्लंडला पराभूत करून मालिका जिंकली.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा रांची येथील माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या फार्महाऊसवर पोहोचला.
जडेजा एक सहकारी म्हणून नाही तर एक चाहता म्हणून माहीच्या फार्महाऊसवर पोहोचला, ज्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जडेजाने धोनीच्या फार्महाऊसच्या मुख्य प्रवेशद्वारासोबतचे काही फोटो शेअर केले, यासोबत त्याने लिहिले की, दिग्गजाच्या घरासमोर फॅन म्हणून पोज देणे खूप छान वाटले.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जडेजा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो.
जडेजानेच चेन्नईला मागील वर्षी म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारून विजेतेपद मिळवून दिले होते.
गुजरात टायटन्सला नमवून चेन्नईच्या संघाने पाचव्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. अखेरच्या दोन चेंडूवर कमाल करत जड्डूने गुजरातच्या तोंडचा घास पळवला होता.