Join us

भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीनं शेअर केला 'तोच' ग्लॅमरस फोटो; चाहत्यांनी घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 18:46 IST

Open in App
1 / 6

भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे त्यांच्या पत्नीदेखील प्रसिद्धीच्या झोतात असतात... टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागर आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते.

2 / 6

भुवनेश्वर आणि नुपूरचे डिसेंबर २०१७ मध्ये लग्न झाले. या दोघांना एक मुलगी आहे. अलीकडेच वाढदिवशी पतीने दिलेल्या सरप्राईजची झलक नुपूरने शेअर केली होती.

3 / 6

काही दिवसांपूर्वी नुपूरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक ग्लॅमरस फोटो शेअर केला होता. आता तिने तोच फोटो इंस्टा स्टोरीवर ठेवत सर्वांचे लक्ष वेधले. या फोटोवर चाहते विविध प्रतिक्रिया देत तिची फिरकी घेत आहेत.

4 / 6

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. आयपीएल २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने प्रभावी कामगिरी केली.

5 / 6

भुवीने आयपीएल २०२४ मध्ये खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये ९.३५ च्या सरासरीने गोलंदाजी करून ११ बळी घेतले आहेत. त्याने टीम इंडियासाठी त्याने २१ कसोटी सामने खेळले असून ६३ बळी पटकावले आहेत.

6 / 6

याशिवाय १२१ वन डे सामने खेळणाऱ्या भुवीने १४१ बळी घेतले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-२० मध्ये त्याच्या नावावर ८७ सामन्यांमध्ये ९० बळींची नोंद आहे.

टॅग्स :भुवनेश्वर कुमारऑफ द फिल्ड