PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही

T20 World Cup 2024 : भारतीय संघ ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी रवाना झाला आहे.

ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची पहिली बॅच रवाना झाली आहे. आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यापूर्वीच भारतीय संघातील शिलेदार अमेरिकेला गेले. पण, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या पहिल्या बॅचमध्ये दिसला नाही.

भारतीय संघ अमेरिकेला जात असल्याची झलक बीसीसीआयने शेअर केली आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह फोटोंमध्ये दिसत आहे.

अष्टपैलू शिवब दुबेशिवाय राखीव खेळाडू शुबमन गिल देखील दिसत आहे. भारताचा सराव सामना १ जून रोजी बांगलादेशविरूद्ध होणार आहे.

१ जूनपासून ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार स्पर्धेतील पहिला सामना २ जून रोजी खेळवला जाईल, जो अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे.

टीम इंडिया ५ जूनपासून आपल्या अभियानाची सुरुवात करेल. भारत आणि आयर्लंड यांच्यात हा सामना होणार आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना ९ जून रोजी पाकिस्तानविरूद्ध खेळवला जाईल.

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. - राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.

गट अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका