T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 14 खेळाडूंसह ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. 23 ऑक्टोबरला भारताला आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी संघ प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त झाला होता.
आशिया चषकात रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला होता, तर जसप्रीत बुमराहलाही टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतीमुळे बाहेर राहावे लागले आहे. या यादीत आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे दीपक चाहर.
चाहरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-20 दरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-20 खेळू शकला नाही आणि दुखापतीमुळे तो इतर दोन सामन्यांतून बाहेर पडला. चाहर हा टी-20 वर्ल्ड कप स्टँडबायचा भाग आहे. तो अद्याप विश्वचषकातून पूर्णपणे बाहेर नसला तरी बीसीसीआयने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
जडेजा आणि बुमराह या दोन प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर भारत विश्वचषकापूर्वी त्यांचा बदली खेळाडू शोधण्याच्या तयारीत आहे. मोहम्मद शमी 15 वा खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, अशी अपेक्षा आहे. तो बुमराहची जागा घेणार आहे. दरम्यान, या मेगा इव्हेंटमध्ये जडेजाची उणीव भरून काढू शकणाऱ्या खेळाडूचे नाव युझवेंद्र चहलने सांगितले आहे. दैनिक जागरणशी संवाद साधताना त्याने यावर भाष्य केले.
रवींद्र जडेजा हा जागतिक दर्जाचा गोलंदाज तसेच महान फलंदाज आहे. त्याची जागा घेणे कठीण आहे, मात्र अक्षर पटेल त्याची पोकळी भरून काढू शकतो. अक्षर हा T20 विश्वचषकातील भारतीय संघाचा एक भाग आहे आणि ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत त्याने छाप पाडली असल्याचं वक्तव्य चाहर याने केले.
“जडेजा हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे आणि आता तो चांगली फलंदाजीही करत होता. दुखापती होतच राहतात, पण अक्षर पटेल ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यामुळे एक पर्याय मिळाला आहे. जडेजाची जागा कोणीही घेऊ शकत नाही, मात्र अक्षरने तो करू शकतो हे दाखवून दिले असल्याचेही तो म्हणाला.