Join us  

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final: वर्ल्ड कप फायनल पाहायला येणार होते पंतप्रधान इम्रान खान, पण आता म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:39 AM

Open in App
1 / 6

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : Super 12 फेरीत भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया या संघांना लोळवून उपांत्य फेरीत पोहोचणारा पाकिस्तान संघ जेतेपद पटकावेल, असाच दावा केला गेला. त्यांचा फॉर्म पाहता त्यात काही चुकीचही नव्हतं. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान व माजी कर्णधार इम्रान खान ( Imran Khan) हेही फायनलमध्ये पाकिस्तानला चिअर करण्यासाठी येणार होते. पण, उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा पराभव केला अन् इम्रान खान यांचं विमान दुबईच्या दिशेनं उड्डाण करण्याआधीच मागे फिरलं...

2 / 6

ऑस्ट्रेलियानं पाच विकेट्स व सहा चेंडू राखून पाकिस्तानवर विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी त्यांच्यासमोर आता न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. २००९ची चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१५चा वन डे वर्ल्ड कप आणि आता २०२१चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदासाठी हे कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत.

3 / 6

पाकिस्तानकडून बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.

4 / 6

ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. वॉर्नर ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सहा षटकांत ६८ धावा करायच्या होत्या. मॅथ्यू वेड व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाला वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला. शाहिननं १९वे षटक फेकले. शादाबनं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

5 / 6

पाकिस्ताननं आजचा सामना जिंकला असता तर १४ नोव्हेंबरला खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी इम्रान खान दुबईत येणार होते. पण आता त्यांना मायदेशातच थांबावे लागेल.

6 / 6

पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांनी ट्विट केलं की, बाबर आजम आणि टीमसाठी- मला माहित्येय यावेळी तुमच्या मनात काय चाललं असेल , कारण मिही या परिस्थितीतून गेलोय. पण, तुम्ही ज्या प्रकारे खेळलात त्याचा अभिमान आहे. ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानइम्रान खान
Open in App