T20 World Cup, Hasan Ali : भारतीय असल्याचा मला अभिमान!; हसन अलीची पत्नी Samiya Arzooनं पाकिस्तानींना सुनावलं, पंतप्रधान इम्रान खान यांनाही वादात ओढलं

T20 World Cup, PAK vs AUS, Hasan Ali : साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. हसन अली ( Hasan Ali dropped Catch) सोडलेला झेल पाकिस्तानला महागात पडला अन् चाहत्यांनी राग काढला..

T20 World Cup, PAK vs AUS, Hasan Ali : साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. मॅथ्यू वेडनं १७ चेंडूंत नाबाद ४१ धावा करून पाकिस्तानच्या तोंडचा विजयाचा घास पळवला. १९व्या षटकात हसन अलीनं जीवदान दिल्यानंतर वेडनं सलग तीन षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्स व १ षटक राखून विजय मिळवून दिला.

या पराभवानंतर पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली ( Hasan Ali) याच्यावर व कुटुंबियांवर टीका होऊ लागली. पाकिस्तानी गोलंदाजाची पत्नी सामिया आरझू ( Samiya Arzoo) ही भारतीय आहे आणि त्यावरूनही तिला रॉ एजंट व पनवती असल्याची टीका झाली. इतकंच नव्हे तर या दाम्पत्याच्या मुलीवरही अत्याचाराची धमकी देण्यात आली.

दोन दिवस सोशल मीडियावरील या अभद्र ट्रोलिंगनंतर अखेर भारतीय मुलीनं पाकिस्तानी चाहत्यांना त्यांची जागा दाखवली. सोशल मीडियावर सामियानं सडेतोड मत मांडताना ट्रोलर्सना खडेबोल सुनावले. तिनं पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) यांनाही या वादात ओढलं अन् माहेरी निघून जाण्याची धमकी दिली.

हरयाणात जन्मलेली सामिया मागील अनेक वर्षांपासून दुबईत एअर अमीरातीमध्ये काम करत होती. ती एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर होती. तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली. मागील अनेक वर्षांपासून सामिया दुबईतच स्थायिक झाली आहे. तिचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात.

सामियानं ट्विट केलं की,'' मी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाला आवाहन करू इच्छिते की, त्यांनी पाकिस्तानी फॅन्सकडून आमच्या कुटुंबियांवर होणाऱ्या टीकांवर लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई करावी. पाकिस्तानी चाहत्यांचा राग मी समजू शकते, परंतु जय-पराजय हा खेळाचाच भाग आहे.''

''अनेक पाकिस्तानी चाहत्यांना असं वाटतं की मी भारतीय एजंट/पनवती आहे, त्याचे मला खूप वाईट वाटते. पाकिस्तानी संघानं संधी गमावली, हार पत्करली याचे हसन अलीची पत्नी म्हणून मलाही वाईट वाटतं. पण, सामन्यानंतर आम्हाला जीवेमारण्याच्या धमक्या मिळू लागल्या,''असंही तिनं लिहिलं.

''काही निलाजरे चाहते आमच्या लहान मुलीलाही टार्गेट करत आहेत आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. जर मला व कुटुंबियांना सुरक्षिततेची हमी मिळणार नसेल, तर मी माझ्या माहेरी ( हरयाणा) कुटुंबियांकडे निघून जाईन. मी डॉ. जयशंकर यांनाही एक भारतीय म्हणून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करते,''असेही ट्विट करत तिनं भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याकडे विनंती केली.

ती पुढे लिहिते,''मी पाकिस्तानच्या लोकांना नम्रपणे आवाहन करते की, मला भारतीय म्हणून अभिमान आहे. मी R&W agent नाही आणि माझा पती हसन अली हा शिया आहे म्हणून त्यानं झेल सोडला, असे तर्क लावू नका. त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटूद्या आणि हल्ले करणे थांबवा.''