PHOTOS : आनंद गगनात मावेना! ऑस्ट्रेलियाचा पराभव, अफगाणिस्तानचा जल्लोष; देशात चाहते एकवटले

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी कमाल करताना कांगारूंचा २१ धावांनी पराभव केला.

बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा प्रथमच पराभव करताच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. त्यांच्यासह चाहत्यांनी आनंद साजरा केला.

ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. सुपर-८ च्या फेरीत अफगाणिस्तानच्या संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली.

अफगाणिस्तानने सातवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तानने २१ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर १४९ धावांचे सन्मानजनक लक्ष्य ठेवले होते.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १२७ धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबने सर्वाधिक चार बळी घेतले. तर नवीन-उल-हकने ३ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियन संघाने ६ वेळा वन डे विश्वचषक आणि एकदा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला आहे.

अफगाणिस्तानच्या विजयानंतर त्यांच्या देशात चाहते एकवटले. त्यांनी फटाके वाजवून विजयाचा आनंद साजरा केला.

सुपर-८ मध्ये अफगाणिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे.

साखळी फेरीत अफगाणिस्तानने न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाला पराभवाची धूळ चारून क्रिकेट विश्वाला धक्का दिला होता.