Join us

T20 World Cup 2022: अगदीच साधारण दिसतेस, जसप्रीत बुमराहला कसं पटवलंस? संजना गणेशनच्या उत्तराने ट्रोलर क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 22:37 IST

Open in App
1 / 6

भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-२० वर्ल्डकप खेळू शकलेला नाही. मात्र त्याची पत्नी वर्ल्डकपमध्ये आयसीसीकडून अँकरिंग करताना दिसत आहे. यादरम्यान, एका ट्रोलरला बुमराहची पत्नी संजना गणेशन हिला ट्रोल करणे चांगलेच महागात पडले आहे.

2 / 6

त्याचं झालं असं की संजना गणेशन हिने हल्लीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर एका ट्रोलरने अशी काही कमेंट केली की, त्यामिळे संतापलेल्या संजना हिने तिला चोख प्रत्युत्तर दिले.

3 / 6

या फोटोमध्ये संजना गणेशन हिने अॅडिलेडच्या ग्राऊंडवर दिसत आहे. या फोटोवर एका युझरने कमेंट केली, मॅम तुम्ही एवढ्या सुंदर दिसत नाही, मात्र बुमराहला कसं पटवलं, असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर संतप्त झालेल्या संजना हिने दिलेल्या सणसणीत उत्तराने हा ट्रोलर क्लीन बोल्ड झाला. तिने उत्तरदाखल लिहिले की, स्वत: पायताणासारखा चेहर घेऊन फिरतोयस त्याचं काय? संजनाचे हे उत्तर खूप व्हायरल होत आहे.

4 / 6

महाराष्ट्रातील पुण्यात राहणारी संजना गणेशन ही स्पोर्ट्स प्रेझेंटेटर आहे. ती वर्ल्डकपपासून आयपीएलपर्यंत अनेक सीरिजमध्ये होस्ट म्हणून काम पाहिले आहे.

5 / 6

जसप्रीत बुमराहने संजना गणेशन हिच्याशी मार्च २०२१ मध्ये विवाह केला होता. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांची भेट २०१९ च्या आयसीसी वनडे वर्ल्डकपदरम्यान झाली होती.

6 / 6

संजना गणेशन हिने स्पोर्ट्स प्रेझेंटर बनण्यापूर्वी मॉडेलिंगमध्ये नावलौकिक मिळवला आहे. सन २०१४ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत आपलं नशीब आजमावलं होतं. तिथे तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

टॅग्स :संजना गणेशनजसप्रित बुमराहट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App