भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत आणि आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्यांनी १८६ धावा केल्या आहेत.
भारतीय चाहत्यांना भेटण्यासाठी चाहते त्यांच्या सराव सत्र पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. संधी मिळताच ते भारतीय खेळाडूंसोबत फोटोही काढून घेत आहेत. सध्या असाच एक फोटो चर्चेत आला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने एका तरुणीसोबत फोटो काढला.
विराटच्या त्या फॅनने तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला अन् तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढली.
विराटसोबतचा हा फोटो व्हायरल होताच ती तरुणी व्हायरल झाली आणि तिच्या सुंदरतेची चर्चा सुरू झाली. अमीषा बसेरा असे या तरुणीचे नाव आहे.
अमीषा ही क्वींसलँड येथे शिक्षण घेतेय. विराट सोबतच्या फोटोने तिचे फॉलोअर्स वाढले.