हैदराबाद : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा टी-20 सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावा लागला.यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली.
भारताने रांचीमध्ये पहिल्या टी-20 सामन्यात 9 गडी राखून विजय मिळवला होता, पण गुवाहाटीमध्ये यजमान संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यामुळे तिस-या आणि निर्णायक टी-20 सामना रंगत आणणारा होता. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासून पावसाने हजेरी लावली. त्यानंतर काही क्षणानंतर पावसाने विश्रांती घेतली.
मात्र, पावसामुळे मैदान खेळण्यायोग्य नव्हते. मैदानाचा हा भाग सुकवण्यासाठी काही कर्माचाऱ्यांनी अक्षरश: मैदानात टेबल फॅन आणून लावले.
तरीही मैदान सुकवण्यात कर्मचाऱ्यांना अपयश आले. यामुळे बराच वेळ वाया गेल्यामुळे अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.