Join us  

Suryakumar Yadav New Car MS Dhoni Connection: सूर्यकुमारने घेतली नवी SUV कार; MS धोनीशी आहे खास कनेक्शन! पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 10:05 AM

Open in App
1 / 6

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने एक नवीन कार खरेदी केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या कारसोबतचे फोटोही शेअर केले आहेत.

2 / 6

सूर्यकुमारने विकत घेतलेली कार आहे निसान जोंगा. या कारची किंमत भारतात ६ लाखांपासून पुढे सुरू होते.

3 / 6

सूर्यकुमारने आपल्या कारच्या फोटोसह एक कॅप्शनही लिहिलं आहे. 'माझ्या कुटुंबातील भल्यामोठ्या नव्या खेळण्याला सगळ्यांनी hello म्हणा', असं ते कॅप्शन आहे.

4 / 6

महत्त्वाचे म्हणजे, सूर्यकुमार यादवने विकत घेतलेल्या या दमदार कारचं आणि धोनीचंही खास कनेक्शन आहे.

5 / 6

निसान जोंगा ही कार आधी युद्धभूमीवर भारतीय लष्करात वापरली गेली होती असं म्हणतात. पण जेव्हा या कारचं सर्वसामान्यांसाठी उत्पादन सुरू झालं तेव्हा धोनीने ही कार विकत घेतली.

6 / 6

महेंद्रसिंग धोनीकडे गडद हिरव्या रंगाची निसान जोंगा कार आहे. धोनीने जेव्हा ही कार घेतली, तेव्हा ही कार पुन्हा ट्रेंडमध्ये आली. धोनी त्याच्या कारला जीवापाड जपतो. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीसूर्यकुमार अशोक यादवकारनिस्सान
Open in App