Join us  

Record : सूर्यकुमार यादवचा भीमपराक्रम; केला असा विक्रम जो एकाही भारतीयाला नाही जमला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 2:21 PM

Open in App
1 / 5

सूर्या ४४ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. भारताकडून सर्वाधिक ट्वेंटी-२० धावा करणाऱ्या फलंदाजांत सूर्याने शिखर धवनला मागे टाकून चौथे स्थान पटकावले आहे. विराट कोहली ( ४००८), रोहित शर्मा ( ३८५३) व लोकेश राहुल ( २२६५) हे सूर्याच्या पुढे ( १७८०) आहेत. शिखर धवनला ( १७५९) त्याने मागे टाकले.

2 / 5

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये सूर्याकुमार यादवने १२ पुरस्कारांसह ( ५१ सामने) तिसरे स्थान पटकावले आहे. विराट कोहली १५ ( ११५ सामने) व मोहम्मद नबी १४ ( १०९ सामने) हे याबाबतीत आघाडीवर आहेत. सूर्याने रोहित शर्माच्या १२ ( १४८ सामने) पुरस्कारांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

3 / 5

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १०० षटकार पूर्ण केले आणि सर्वात कमी चेंडूंत १०० षटकार खेचणाऱ्या फलंदाजांत तो तिसऱ्या क्रमांकावर आलाय. सूर्याने १००७ चेंडूंत हा पल्ला गाठून ख्रिस गेलला ( १०७१ चेंडू) मागे टाकले. एव्हिन लुईस ( ७८९) व कॉलिन मुन्रो ( ९६३) हे आघाडीवर आहेत.

4 / 5

कमी इनिंग्जमध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १०० षटकार पूर्ण करणाऱ्या फलंदाजांत सूर्याने ( ४९ इनिंग्ज) दुसरे स्थान पटकावताना ख्रिस गेलशी बरोबरी केली, तर कॉलिन मुन्रो ( ५७) ला मागे टाकले. यातही एव्हिन लुईस ( ४२) अव्वल स्थानी आहे. भारताकडून ट्वेंटी-२०त षटकारांचे शतक आतापर्यंत तीन फलंदाजांना करता आले आहे. रोहित शर्मा ( १८२), विराट कोहली ( ११७) आणि सूर्यकुमार ( १००) असे हे तीन शतकवीर आहेत. लोकेश राहुल ९९ षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

5 / 5

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १५००+ धावा आणि १५०+ स्ट्राईक रेट असलेले तीनच फलंदाज आहेत आणि त्यात सूर्यकुमार यादवचा दुसरा क्रमांक येतोय. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल २१५९ धावा व १५०.९७चा स्ट्राईक रेटसह अव्वल स्थानी आहे. सूर्याने १७४.३३ च्या स्ट्राईक रेटने १७८० धावा केल्या आहेत, तर कॉलिन मुन्रोने १५६.४४च्या स्ट्राईक रेटने १७२४ धावा चोपल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माविराट कोहली
Open in App