Join us

Suresh Raina Tweet after CSK Loss, IPL 2022: MS Dhoni धोनीला फटकेबाजी करू न देणारा गोलंदाज Arshdeep Singh चे सुरेश रैनाने केलं तोंडभरून कौतुक, ट्वीट करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 01:38 IST

Open in App
1 / 6

Suresh Raina Tweet after CSK Loss, IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने ११ धावांनी थरारक विजय मिळवला. शिखर धवनच्या नाबाद ८८ धावा आणि रिषी धवनचे दडपणाखाली असतानाही MS Dhoni समोर टाकलेला उत्कृष्ट शेवटचे षटक यामुळे पंजाबला विजय मिळवता आला.

2 / 6

चेन्नईच्या विजयासाठी अंबाती रायुडूने तुफान फटकेबाजी केली. त्याने ७ चौकार आणि ६ षटकार खेचत ३९ चेंडूत ७८ धावा केल्या. पण रबाडाने त्याला मोक्याच्या क्षणी बाद करत सामन्यात रंगत आणली.

3 / 6

या सामन्यात १९वे षटक महत्त्वाचे ठरले. १२ चेंडूत ३५ धावांची गरज असताना आणि महेंद्रसिंग धोनीसारखा फिनिशर समोर असताना अर्शदीप सिंगने त्या षटकात केवळ १ चौकार खात एकूण आठच धावा दिल्या. धोनीला रोखणाऱ्या अर्शदीपचं सुरेश रैनाने तोंडभरून कौतुक केलं. तसेच, त्याला मानाचा मुजरादेखील केला.

4 / 6

अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) अप्रतिम गोलंदाजी करत फारशा धावा न देता चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवले. त्याने ४ षटकांत केवळ २३ धावाच दिल्या आणि १ बळी टिपला. त्याच्या भेदक माऱ्यामुळे CSKला आठ सामन्यात सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

5 / 6

सुरेश रैनाने आपल्या ट्वीटमध्ये अंबाती रायुडूच्या प्रयत्नांचे कौतुक केले. 'दोन्ही संघांनी उत्तम क्रिकेट खेळलं. अंबाती रायुडू, तू चेन्नईच्या संघाकडून भन्नाट कमबॅक केलास. मला तुझा आणि तुझ्या फलंदाजीचा अभिमान आहे', असं रैनाने लिहिलं. पुढेही त्याने ट्वीट केले.

6 / 6

धोनीला १९व्या षटकात अजिबात फटकेबाजी करून न देणाऱ्या गोलंदाजाची रैनाने स्तुती केली. 'पंजाबच्या संपूर्ण संघाचं मनापासून अभिनंदन! आणि उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंगला मानाचा मुजरा', असं रैनाने आपल्या ट्वीटमध्ये खास नमूद केलं.

टॅग्स :आयपीएल २०२२सुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स
Open in App