Join us  

Suresh Raina Retirement: सुरेश रैनाचे 'हे' विक्रम तुम्हाला करतील चकीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 12:48 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी सायंकाली 7.29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला. हा धक्का पचेपर्यंत भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुरेश रैनाच्या रुपानं दुसरा धक्का बसला. धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत रैनानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

2 / 10

रैनानं 2018मध्ये अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं इस्टाग्रामवर पोस्ट लिहिली की,''धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद निराळाच होता. त्यामुळे तू निवृत्ती घेतल्यानंतर मीही तुझ्या या प्रवासात येण्याचा निर्णय घेत आहे. टीम इंडिया धन्यवाद. जय हिंद.''

3 / 10

रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.

4 / 10

क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सुरेश रैना हा पहिला भारतीय फलंदाज आहे. त्यानं हाँगकाँगविरुद्ध पहिले वन डे शतक, श्रीलंकेविरुद्ध पहिले कसोटी शतक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले ट्वेंटी-20 शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो पहिला भारतीय आहे.

5 / 10

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा नियमित सदस्य असलेल्या सुरेश रैनाच्या नावावर सर्वाधिक 192 सामने आहेत आणि यंदाच्या आयपीएलमध्ये 200 सामन्यांचा पल्ला पार करणारा तो पहिला खेळाडू बनणार आहे.

6 / 10

2008पासून आयपीएलला सुरुवात झाल्यापासून ते 2016पर्यंत रैना एकही सामना मुकलेला नाही. 2016च्या आयपीएलमध्ये गुजरात लायन्सचा कर्णधार असलेल्या रैनाला त्याची पत्नी गर्भवती असल्यानं सामन्यांना मुकावे लागले होते. 2018च्या आयपीएलमध्ये रैनाला 158 सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्सकडून पहिला सामना खेळता आला नव्हता.

7 / 10

2019च्या पहिल्या आयपीएल सामन्यात रैनानं आयपीएलमध्ये 5000 धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. आठवड्यातच विराट कोहली या पंक्तीत दाखल झाला.

8 / 10

2010मध्ये कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा 12वा भारतीय फलंदाजाचा मान रैनानं पटकावला.

9 / 10

ट्वेंटी-20 आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे.

10 / 10

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 6000 आणि 8000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज

टॅग्स :सुरेश रैनाभारतीय क्रिकेट संघचेन्नई सुपर किंग्सआयपीएल