Join us

Suresh Raina, IPL 2022 Winner: सुरेश रैना म्हणतो, यंदा 'हा' संघ जिंकणार IPL! पाहा, कोणाला दिला पाठिंबा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 14:52 IST

Open in App
1 / 6

Suresh Raina, IPL 2022 Winner: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना यंदाच्या हंगामात खेळला नाही. CSK किंवा अन्य कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली न लावल्याने त्या या हंगामाला मुकावे लागले.

2 / 6

IPL खेळायला मिळाले नाही त्यामुळे यावर्षी सुरेश रैना कॉमेंटेटरच्या भूमिकेत दिसला. तसेच, सामन्यानंतर आणि आधी क्रिकेट जाणकाराच्या भूमिकेतही त्याला चाहत्यांची पसंती मिळाली.

3 / 6

यंदाच्या हंगामात रैनाचा आवडता संघ CSK साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर फेकला गेला. पण सुरेश रैनाने मात्र यंदाचं IPL कोणता संघ जिंकेल, याचा अंदाज बांधला आहे.

4 / 6

सुरेश रैनाचा IPL मधील अनुभव खूप दांडगा आहे. आतापर्यंत त्याने IPL मध्ये ५ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच सर्वाधिक धावांच्या बाबतीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

5 / 6

सुरेश रैनाने आपल्या CSK ला संघाला अनेक हंगामात मोठं यश मिळवून दिले. पण २०२० आणि २०२२ या दोन हंगामात रैना CSK चा भाग नव्हता. या दोनही हंगामात CSK साखळी फेरीतच बाद झाला. पण रैनाच्या मते यंदा कोणीतरी दुसराच संघ चॅम्पियन होणार आहे.

6 / 6

सुरेश रैना म्हणाला की यावर्षी मला RCB ने स्पर्धा जिंकावी असं वाटतं. RCB साठी विराट कोहलीने दमदार कामगिरी करून संघाला विजेतेपद मिळवून द्यावं, असंही तो म्हणाला.

टॅग्स :आयपीएल २०२२सुरेश रैनाचेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App