Most Catches In Test : स्टीव्ह स्मिथनं मोडला द्रविडचा रेकॉर्ड! इथं जो रुट आहे टॉपला

इथं एक नजर टाकुयात स्टीव्ह स्मिथसह कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाच्या रुपात सर्वाधिक झेल टिपणाऱ्या खेळाडूंवर

अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ फलंदाजीत फ्लॉप ठरला. जोश टंग याने पहिल्या डावात त्याला अवघ्या ९ धावांवर क्लीन बोल्ड केले.

फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या स्टीव्ह स्मिथ याने क्षेत्ररक्षणावेळी कमालीची कामगिरी करत मोठा डाव साधला आहे. कसोटीत सर्वाधिक झेल टिपणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकले.

इथं एक नजर टाकुयात स्टीव्ह स्मिथसह कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाच्या रुपात सर्वाधिक झेल टिपणाऱ्या खेळाडूंवर

कसोटी क्रिकेटमध्ये फॅब फोरमधील जो रुट सर्वाधिक झेल टिपणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानावर आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने १६२ सामन्यातील ३०९ डावात २१४ झेल घेतले आहेत.

स्टीव्ह स्मिथ याने २०१० पासून आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत १२२ सामन्याती २३२ डावात २१२ झेल घेतले आहेत. अ‍ॅशेस कसोटी मालिकेत त्याला जो रुटला ओव्हरटेक करण्याची संधी आहे.

राहुल द्रविडनं १९९६ ते २०१२ या कालावधीतील आपल्या कसोटी कारकिर्दीत १६४ सामन्यातील ३०१ डावात २१० झेल टिपल्याचा रेकॉर्ड आहे.

श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने याने १९९७ ते २०१४ या कालावधीतील आपल्या कसोटी कारकिर्दीत १४९ सामन्यातील २७० डावात २०५ झेल घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस हा क्षेत्रक्षकाच्या रुपात २०० झेलचा आकडा पार करणारा पाचवा खेळाडू आहे. १९९५ ते २०१३ या कारकिर्दीत त्याने १६६ सामन्यातील ३१५ डावात २०० झेल टिपले आहेत.