Join us  

Stats : 225 चौकार, 24 षटकार!, कसोटी क्रिकेटमध्ये घडला चमत्कार; ENG vs NZ सामन्याने मोडले अनेक विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:28 PM

Open in App
1 / 8

ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात अविश्वसनीय विजयाची नोंद केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी पाचव्या दिवसाच्या टी ब्रेकनंतर ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी करून विजयाचा मार्ग सहज सोपा केला. कर्णधार बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टो ( Johnny Bairstow ) यांनी वातावरण बदलले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकाही 2-0 अशी जिंकली.

2 / 8

न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ५५३ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने जो रूट व ऑली पोप यांच्या शतकांच्या जोरावर ५३९ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव २८४ धावांवर गडगडला. न्यूझीलंडने विजयासाठी अखेरच्या दिवशी ठेवलेल्या २९९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ४ फलंदाज ९३ धावांवर माघारी परतले होते. पण, त्यानंतर स्टोक्स व बेअरस्टोची फटकेबाजी रंगली.

3 / 8

बेअरस्टोने ७७ चेंडूंत शतक पूर्ण केले. इंग्लंडकडून हे कसोटीतील दुसरे सर्वात जलद शतक ठरले. त्याने बेन स्टोक्सचा २०१५ सालचा ८५ चेंडूंत शतकाचा ( वि. न्यूझीलंड) विक्रम मोडला. इंग्लंडकडून गिलबर्ट जेसोप यांनी १९२०साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७६ चेंडूंत शतक झळकावले होते.

4 / 8

बेअरस्टो ९२ चेंडूंत १४ चौकार व ७ षटकारांसह १३६ धावांवर बाद झाला. त्याने पाचव्या विकेट्ससाठी १२१ चेंडूंत १७९ धावांची भागादारी केली. स्टोक्सने नाबाद ७५ धावांची खेळी करून इंग्लंडला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. इंग्लंडने ही WTC मध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली.

5 / 8

बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी 8.87 च्या सरासरीने 179 धावांची भागीदारी केली आणि ही कसोटी क्रिकेटमधील तिसरी जलद शतकी भागीदारी ठरली. इंग्लंडने अखेरच्या सत्रात 10च्या सरासरीने धावा केल्या. इंग्लंडला 38 षटकांत 160 धावा हव्या होत्या अन् त्यांनी 16 षटकांत या धावा केल्या. याआधी न्यूझीलंडने 2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8.29 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

6 / 8

इंग्लंडने 299 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून ट्रेंट ब्रिज कसोटीत सर्वाधिक लक्ष्याच्या यशस्वी पाठलागाचा विक्रम नावावर केला. यापूर्वी 2004मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 284 धावांचे लक्ष्य पार केले होते.

7 / 8

या सामन्यात चौकाराने 1000+ धावा झाल्या आणि कसोटीच्या इतिहासात असे प्रथमच घडले. यापूर्वी 2004 मध्ये ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातल्या सामन्यात चौकाराने 976 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड-इंग्लंड कसोटीत 225 चौकार व 24 षटकार खेचले गेले. यापर्वी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2004मधील सिडनी कसोटीत 242 चौकार लागले होते.

8 / 8

दोन्ही संघांनी मिळून 1675 धावा केल्या. इंग्लंडमध्ये खेळलेल्या कसोटीतील ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी 1948 साली इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया कसोटीत 1723 धावा झाल्या होत्या.

टॅग्स :इंग्लंडन्यूझीलंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाबेन स्टोक्स
Open in App