श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथला कारकिर्दीच्या अखेरच्या सामन्यात पराभवाने निरोप घ्यावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे त्याने आधीच सांगितले होते. मात्र, त्याला विजयी निरोप देण्यात श्रीलंकेच्या संघाला अपयश आले. इंग्लंडने 211 धावांनी हा सामना जिंकला. हेराथच्या विक्रमांचा घेतलेला आढावा
400 विकेट घेणारा पहिला डावखुरा फिरकीपटू
सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा गोलंदाज
एका मैदानावर विकेटचे शतक करणारा तिसरा
श्रीलंकेकडून सर्वाधिक वर्ष कसोटी क्रिकेट खेळणारा खेळाडू
कसोटीच्या चौथ्या डावात सर्वाधिक पाच विकेट घेणारा गोलंदाज