Join us  

श्रीलंकेचा फडशा, भारताने नोंदवला ‘क्लीनस्वीप’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 6:17 AM

Open in App
1 / 6

तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं लंकेचा पाच विकेटनं पराभव करत टी-20 मालिकेत 3-0नं विजय मिळवला आहे. त्याबरोबरच आयसीसी क्रमवारीत पाचव्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. (सर्व फोटो -बीसीसीआय)

2 / 6

वॉशिंग्टन सुंदर (वय १८) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पदार्पण करणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला. याआधी दिल्लीचा रिषभ पंत याने वयाच्या १९व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध टी२० पदार्पण करत सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळवला होता.

3 / 6

लंकेने दिलेल्या १३६ धावांचे आव्हान भारताने ४ चेंडू राखून पार पाडले. भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली असल्याने वानखेडे स्टेडियमवरील हा सामना अपौचारीकतेचा ठरला होता

4 / 6

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-यापुढे पुन्हा एकदा ढेपाळलेल्या श्रीलंकेने तिसºया आणि अखेरच्या टी२० सामन्यात निर्धारीत २० षटकात ७ बाद १३५ धावांची मजल मारली. जयदेव उनाडकट आणि हार्दिक पांड्या यांनी अप्रतिम मारा करताना श्रीलंका फलंदाजांची कोंडी केली

5 / 6

धावांचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. लोकेश राहुल (४) स्वस्तात परतल्यानंतर रोहित - श्रेयस अय्यर या मुंबईकर जोडीने भारताला सावरले. परंतु, आक्रमक फटका मारण्याच्या नादात रोहित (२७) झेलबाद झाला

6 / 6

अय्यर - मनिष पांडे यांनी ४२ धावांची भागीदारी करुन पडझड रोखली. परंतु, ठराविक अंतराने बळी घेत लंकेन भारतावर दडपण आणले. एकवेळ १६.१ षटकात भारताची ५ बाद १०८ धावा अशी अवस्था झाली होती. परंतु, दिनेश कार्तिक - महेंद्रसिंग धोनी या जोडीने भारताला विजयी केले. अय्यरने ३२ चेंडूत ३०, तर मनिषने २९ चेंडूत ३२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

टॅग्स :श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा