Join us

वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:12 IST

Open in App
1 / 10

वर्षाचे १२ महिने असतात, ज्यातील ६ महिने तो खेळाडू आराम करतो आणि इतक्या आरामानंतरही तो २७ कोटीहून अधिक कमाई करतो. असं आयुष्य जगणारा क्रिकेटर कोण आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना...तर या क्रिकेटरचे नाव आहे हेनरिक क्लासन

2 / 10

हेनरिक क्लासनने अलीकडेच जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्लासनचा फंडा बिल्कुल सिंपल आहे, ६ महिने आराम आणि ६ महिने काम...तो ६ महिने क्रिकेट फिल्डवर घालवतो, बॅटसह विविध टी-२० लीगमध्ये खेळून स्वत:चे काम करतो आणि त्यातूनच तो २७ कोटींपेक्षा जास्त कमाई करतो.

3 / 10

आता प्रश्न असा पडतो, कोणत्या ६ महिन्यात हेनरिक क्लासन आराम करतो आणि कधी काम करतो? हेनरिक क्लासनचे कामाचे महिने आहेत जानेवारी, त्यात तो SA20 लीगमध्ये खेळतो. त्यानंतर मार्च ते मे महिन्यात तो आयपीएलमध्ये व्यस्त राहतो.

4 / 10

जून महिन्यात क्लासन मेजर लीग क्रिकेट खेळण्यात घालवतो तर जुलै ऑगस्ट या काळात तो १ महिना द हंड्रेडमध्ये क्रिकेट खेळतो. हे महिने वगळता इतर महिन्यात क्लासन आराम करतो, त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवतो.

5 / 10

हेनरिक क्लासन ज्या महिन्यात विविध क्रिकेट लीगमध्ये खेळतो, तिथे खेळण्यासाठी त्याला पगार दिला जातो. तो ज्या टी २० लीगमध्ये खेळतो, तिथला पगार जोडला तर सर्व लीग मिळून त्याला २७.३० कोटीहून अधिक पगार मिळतो.

6 / 10

जानेवारी महिन्यात SA20 लीगमध्ये खेळण्यासाठी क्लासनला ४५ लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो, ही रक्कम येणाऱ्या २०२६ च्या ऑक्सनमध्ये वाढवण्याची पूर्ण शक्यता आहे. क्लासनला सर्वात जास्त पगार भारतातील आयपीएल लीगमध्ये खेळण्यासाठी दिला जातो.

7 / 10

IPL च्या सनराइजर्स हैदराबाद या संघाकडून क्लासन खेळतो, त्याला २३ कोटी रुपये आयपीएलमधून मिळतात. मेजर लीग क्रिकेटमध्ये हेनरिक क्लासनची सॅलरी १.५३ कोटीहून अधिक आहे. तर द हंड्रेड खेळण्यासाठी त्याला जवळपास २.३२ कोटी रुपये पगार दिला जातो.

8 / 10

हेनरिक क्लासन ६ महिने कुठे खेळतो हे तर कळलं, परंतु ज्या महिन्यात तो आराम करतो तेव्हा तो काय करतो हेदेखील पाहू, क्लासन क्रिकेटला विसरून कुटुंबासह मज्जा मस्ती करणे, फिरायला जाणे या गोष्टी करत राहतो.

9 / 10

आयपीएलच्या १८ व्या हंगामातील अखेरच्या सामन्यात हैदराबादच्या ताफ्यातील हेनरिक क्लासेन याने कोलकाता विरुद्ध विक्रमी सेंच्युरी झळकावली होती. त्याने अवघ्या ३७ चेंडूत शतक साजरे केले होते. त्याने IPL च्या इतिहासातील संयुक्तरित्या सर्वात जलदगतीने सेंच्युरी झळकावत युसूफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी केली.

10 / 10

जानेवारी २०२४ मध्ये हेनरिक क्लासनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र जून २०२५ मध्ये साउथ अफ्रीका (CSA)च्या मध्यवर्ती करारातून त्याला वगळण्यात आले होते. यामुळे नाराज असलेल्या क्लासेनने सर्वच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

टॅग्स :आयपीएल २०२४