कोहलीने एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर टाकला होता. या फोटोमध्ये विराटसह मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल दिसत आहेत. भारतीय खेळाडूंबरोबर सपोर्ट स्टाफही दिसत आहे. यावेळी सर्व जणं पाण्यात उतरले होते.
या वेळी सर्वांचे फोटो काढण्यात आले. यामध्ये कोहली आणि बुमरा यांचा एक खास फोटो काढण्यात आला आणि या फोटोमध्ये त्यांचे ६ पॅक्स अॅब्स दिसत होते.
विराट आणि बुमराच्या या फोटोवर युवराजने भन्नाट कमेंट केली आहे.
युवराजने या कमेंटमधून फिटनेसबाबत वक्तव्य केले आहे.
या फोटोवर युवराजने, ' ओ हो, फिटनेस आयडॉल' अशी कमेंट केली आहे.