Join us  

सहा चौकार, १७ षटकार; ५१ चेंडूत १४६ धावांसह या भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये रचला वर्ल्ड रेकॉर्ड

By बाळकृष्ण परब | Published: January 13, 2021 11:16 PM

Open in App
1 / 6

सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मेघालय आणि मिझोराम यांच्यात झालेल्या लढतीत विक्रमांची बरसात झाली. या लढतीत मेघालयचे नेतृत्व करणाऱ्या पुनीत बिष्टने तुफानी फलंदाजी करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पुनीतने अवघ्या ५१ चेंडूत सहा चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने नाबाद १४६ धावा ठोकल्या. या खेळीसह पुनीतने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

2 / 6

नाबाद १४६ धावांच्या खेळीमुळे पुनीत बिष्ट हा टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने श्रीलंकेडे दसून शणाकाचा विक्रम मोडला. शणाकाने २०१६ मध्ये सिंहली स्पोर्टस् क्लबसाठी खेळताना गॉल येथे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत १३१ धावा केल्या होत्या. तर भारताच्या रिषभ पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १२८ धावांची खेळी केली होती.

3 / 6

त्याबरोबरच बिष्टने केलेली नाबाद १४६ धावांची खेळी ही टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाने केलेली सर्वात मोठी खेळी ठरली आहे. पुनीतने ही खेळी करताना लोकेश राहुलचा विक्रम मोडला. लोकेश राहुलने २०२० च्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळतना नाबाद १३१ धावांची खेळी केली होती.

4 / 6

आजच्या खेळीमध्ये पुनीत बिष्टने १७ षटकार ठोकले. त्याबरोबरच टी-२०च्या एका डावात १७ षटकार ठोकण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. एका टी-२० डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बिष्टने गेलसोबत संयुक्तरीत्या दुसरे स्थान पटकावले.

5 / 6

त्याबरोबरच बिष्ट हा टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मात्र आपल्या नावे केला. त्याने श्रेयस अय्यरचा विक्रम मोडला. श्रेयस अय्यरने सिक्कीम विरोधात १४५ धावांची खेळी करताना १५ षटकार ठोकले होते.

6 / 6

पुनीत बिष्टचे शतक आणि योगेश तिवारीच्या ५३ धावांच्या जोरावर मेघालयने २० षटकांत सहा बाद २३० धावा कुटल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मिझोरामला केवळ १०० धावाच जमवता आल्या.

टॅग्स :टी-20 क्रिकेटभारत