सारा तेंडुलकर 'डॉक्टर' बनणार, शुभमन गिल अजून कॉलेजमध्येच अडकलाय; जाणून घ्या दोघांचं शिक्षण

Shubman Gill & Sara Tendulkar Education : शुभमन आणि सारा रिलेशनशिपमध्ये असल्याची दोघांच्या चाहत्यांना खात्री आहे. पण जर आपण शिक्षणाच्या बाबतीत बोललो तर कोण वरचढ ठरतो, हे पाहूयात.

क्रिकेटपटू शुभमन गिल आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर यांच्या डेटींगबाबत सोशल मीडिया अफवा रंगलेल्या पाहायला मिळतात. पण, या दोघांनी कधीच यावर प्रतिक्रिया दिलेली नाही

शुभमन गिल देखील आज भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे. शुभमनचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे झाला. तो शेतकरी कुटुंबातून येतो. शुभमन गिलने आपले शालेय शिक्षण मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट स्कूलमधून केले.

लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केल्याने शुभमनच्या अभ्यासावरही परिणाम झाला. झटपट यशामुळे तो पूर्णपणे क्रिकेटच्या जगाकडे वळला. पण, त्याने पदवी पूर्ण केल्याचे काही वृत्तांमधून समोर आले आहे.

सारा तेंडुलकरने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आणि लंडनमधून ग्रॅज्युएशन केले. साराने युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

साराची आई अंजली तेंडुलकर याही बालरोगतज्ज्ञ होत्या. लंडनमध्ये साराच्या दीक्षांत समारंभात सचिन आणि अंजली तेंडुलकर दोघेही उपस्थित होते. सध्या सारा बॉलिवूडमध्ये येत असल्याच्या बातम्या येत आहेत, मात्र सचिन तेंडुलकरने ही अफवा असल्याचे म्हटले आहे.