१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा

Shubman Gill Birthday Special: Shubman Gill Net Worth: शुबमन गिलला भारतीय क्रिकेटचा 'प्रिन्स' म्हणजे राजकुमार म्हटलं जातं.

आज शुभमन गिलचा २६वा वाढदिवस आहे. तो सध्या दुबईमध्ये आशिया कप खेळण्यासाठी गेला आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला होणार आहे. पण त्याआधी संघाचा उपकर्णधार गिलचा वाढदिवसही साजरा केला जाईल.

एका वृत्तानुसार, शुभमन गिल हा श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक असून, तो सुमारे ५० कोटींचा मालक आहे. ही त्याची एकूण संपत्ती आहे. गिल इतके पैसे कसे कमवतो, कोणकोणत्या मार्गाने त्याचे उत्पन्न येते, याबाबत आज आपण जाणून घेऊया.

शुभमन गिलला क्रिकेटची आवड होती. त्याचे वडील लखविंदर सिंग गिल यांनी त्याला क्रिकेटर बनण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी शुभमनला गावात स्वतः तयार केलेल्या खेळपट्टीवर खूप सराव करायला लावला.

तो गावातील मुलांना गोलंदाजी करण्यास सांगायचा. जो कोणी गिलची विकेट घेईल, त्याला १०० रुपयांचे बक्षीस असायचे. त्यामुळे मुलेही आनंदाने खेळायची. नंतर चांगल्या प्रशिक्षणासाठी शुबमन मोठ्या शहरात आला.

१०० रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ५० कोटींपर्यंत आला आहे. गिल इतका पैसा कुठून कमावतो? जाणून घेऊया. क्रिकेट हा त्याच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे, पण त्याशिवाय तो २० ब्रँड्स एंडोर्स करतो, त्यातून त्याला खूप उत्पन्न मिळते.

शुभमन गिलला BCCI कडून वार्षिक करारानुसार वार्षिक ५ कोटी मिळतात. तर IPL मध्ये सध्या गुजरात टायटन्सकडून १६.५० कोटी मिळतात. याशिवाय, मॅच फी आणि मॅच दरम्यानच्या कामगिरीमुळे मिळणारी कमाई वेगळी असते.

याशिवाय, गिलची इतर कमाई त्याच २० ब्रँड्समधून येते ज्यांना तो एंडोर्स करतो. तो NIKE, Gillette, CEAT, Casio, Bajaj Allianz Life, Coca Cola, My Circle, Beats by Dre, Oakley, The Sleep Company, Muscle Blaze, ITC Engage, TVS, JBL, Tata Capital, Cinthol, Fiama Men, Wings, Capri Loans, Games 24×7 हे ब्रँड एंडोर्स करतो.