शुभमंगल सावधान! कुलदीप यादव आणि वंशिका अडकले विवाह बंधनात, समोर आले लग्नाचे पहिले फोटो

Kuldeep Yadav W0edding With Vanshika: भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव लग्नबंधनात अडकला आहे. कुलदीप आणि वंशिका हे शनिवारी मसुरीमधील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या लग्नसोहळ्यात विवाहबद्ध झाले. आता या विवाहसोहळ्याचे पहिले फोटो समोर आले आहेत.

भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव लग्नबंधनात अडकला आहे. कुलदीप आणि वंशिका हे शनिवारी मसुरीमधील एका आलिशान हॉटेलमध्ये झालेल्या लग्नसोहळ्यात विवाहबद्ध झाले. आता या विवाहसोहळ्याचे पहिले फोटो समोर आले आहेत.

या लग्नसोहळ्यामध्ये कुलदीप यादवने क्रीम गोल्डन रंगाची शेरवानी आणि वंशिका हिने लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या पोषाखात वधूवर खूप सुंदर दिसत होते.

मसुरी येथील द सवॉय हॉटेलमध्ये झालेल्या या लग्न सोहळ्याला बाबा बागेश्वर यांच्यासह माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युझवेंद्र चहल आणि रिंकू सिंह हे सहभागी झाले होते.

कुलदीप यादव आणि वंशिकाने ज्या मंडपात सप्तपदी घेतली, त्याची सजावट कोलकात्याहून आलेल्या फुलांनी करण्यात आली होती. एवढंच नाही तर कुलदीप यादव हा विंटेज कारमध्ये बसून वरात घेऊन आला होता.

दरम्यान, कुलदीप यादवचा हळद समारंभ शुक्रवारी सकाळी झाला होता. तर संगीत सोहळा रात्री रंगला होता. वंशिका आणि कुलदीपच्या लग्नसोहळ्यातील सर्व फोटो समोर आले आहेत. तसेच त्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.