शिवम दुबेने अफगाणिस्तानला धू धू धुतलं, त्या बॅटची किंमत किती? जाणून थक्क व्हाल

शिवम दुबेने ३२ चेंडूत नाबाद ५३ धावा कुटल्या

Shivam Dube Team India, IND vs AFG: टीम इंडियाने दुसऱ्या टी२० सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघ टी२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असून संघ अनेक प्रयोग करत आहे. टीम इंडियाला पहिल्या दोन सामन्यात एक नवा ऑलराऊंडर खेळाडू मिळाला आहे. त्या खेळाडूचे नाव म्हणजे शिवम दुबे.

शिवमने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवली आहे. तो टीम इंडियाचा नवा सिक्सर किंग बनला आहे. त्याने ठोकलेले उत्तुंग षटकार चर्चेचा विषय ठरत आहेत. अशा परिस्थितीत शिवम दुबे वापरत असलेल्या बॅटबद्दल आणि किमतीबद्दल बरीच चर्चा आहे.

शिवम दुबेने दुसऱ्या टी२० सामन्यात ३२ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने या खेळीत ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. पहिल्या टी२० मध्येही शिवमने शानदार खेळी केली होती. त्याच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने दोन्ही सामने सहज जिंकले.

शिवम दुबे गेल्या वर्षभरापासून दमदार फटकेबाजीसाठी ओळखला जातोय. गेल्या वर्षी शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्जमधून खेळताना सिक्सर किंग होण्याची वाटचाल सुरू केली आणि तुफान यश मिळवले.

शिवम दुबेचे षटकार हे नेहमीच चर्चेत आहेत. त्याच्या बॅटची किंमत किती, अशीही चर्चा आहे. शिवम दुबे सध्या SS ची बॅट वापरत आहे. SAREEN SPORTS या कंपनीची ही बॅट आहे. अनेक मोठे खेळाडू या कंपनीची बॅट वापरतात आणि आता त्यात शिवम दुबेचे नावही जोडले गेले आहे.

जर तुम्ही SAREEN SPORTS च्या वेबसाइटवर गेलात तर तुम्हाला बॅटच्या वेगवेगळ्या रेंज दिसतील, सर्वात महागड्या बॅटची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत आहे, त्यात मास्टर रेंज, कोअर रेंज आणि इतर रेंजचाही समावेश आहे. शिवम दुबेची ही बॅट सर्वोत्तम म्हणजेच ५० हजारांच्या आसपासची असावी असे बोलले जात आहे.