२०२३ मध्ये पहिली पत्नी आयेशा मुखर्जीसोबतचं नातं घटस्फोटोनंतर संपुष्टात आल्यावर शिखरनं आयरिश गर्लफ्रेंड सोफी शाइनी हिच्यासोबत नव्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. इथं जाणून घेऊयात त्याच्याशिवाय असे क्रिकेटर्स जे दोन पेक्षा अधिक लग्नामुळे चर्चेत राहिले आहेत त्यासंदर्भातील गोष्ट
भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याने दोन विवाह केले ही गोष्ट कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल. टीम इंडियाचा जम्बो अर्थात कुंबळेने चेतना रामतीर्था हिच्याशी पहिला संसार थाटला होता. १९९९ मध्ये त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर त्याच्या आयुष्यात रचना ही दुसरी पत्नी आली.
भारताचा माजी जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथचाही यात यादीत समावेश आहे. श्रीनाथ १९९९ मध्ये ज्योत्स्नासोबत विवाहबंधनात अडकला. २००७ मध्ये ही जोडी विभक्त झाली. त्यानंतर या क्रिकेटरनं २००८ मध्ये माधवी पत्रावळी हिच्यासोबत लग्न केले.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार आणि क्रिकेट जगतातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॉन्टी रोड्सने १९९४ मध्ये केट मॅकार्थीशी लग्न केले. २०१३ मध्ये त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर २०१४ मध्ये त्याने मेलानी वुल्फशी लग्न करत आयुष्याची नवी इनिंग सुरु केली.
ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज ब्रेट ली आणि एलिझाबेथ केम्प यांचे २००६ मध्ये लग्न झाले होते. २००८ मध्ये ही जोडी फुटली. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरनं लाना अँडरसन हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला.
पाकिस्तानला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार इम्रान खान याने तीन वेळा लग्न केले. १९९५ मध्ये जेमिमा गोल्ड स्मिथ हिच्यासोबत त्याने पहिला संसार थाटला. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दिग्गज क्रिकेटरनं २०१५ मध्ये रेहम खानशी लग्न केले आणि त्याच वर्षी घटस्फोटही घेतला. २०१८ मध्ये या दिग्गजाने बुशरा बीबीशी निकाह केला.
दिशेन कार्तिक याने २००७ मध्ये निकिता वंजारासोबत लग्न उरकले. २०१२ मध्ये तिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर कार्तिक २०१५ मध्ये मध्ये दीपिका पल्लीकलसोबत विवाहबंधनात अडकला. ती एक स्पोर्ट्स वुमन आहे.
ग्लेन मॅकग्राच्या पहिल्या पत्नीचे नाव जेन असं आहे. १९९९ क्रिकेटरचं पहिले लग्न झाला २००८ मध्ये पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर २०१० मध्ये या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनं सारा लिओनार्डीच्या साथीनं आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानचा क्रिकेट शोएब मलिक याने २०१० मध्ये सानिया मिर्झाशी लग्न केल्यावर त्याची पहिली पत्नी आयेशा सिद्धीकी चर्चेत आली होती. त्याने २००२ मध्ये पहिले लग्न केल्याचा गाजावाजा झाला. या चर्चेतही सानियासोबत त्याचा संसार टिकला. पण २०२३ मध्ये शेवटी ही दोघे विभक्त झाली. त्यानंतर शोएबनं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरा निकाह केला.
पाकिस्तानचा वसीम आक्रम याने १९९५ मध्ये हुमा मुफ्तीशी लग्न केले. २००९ मध्ये त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर या क्रिकेटरनं २०१३ मध्ये शॅनिएरा थॉम्पसनशी लग्न उरकले होते.