Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिसेप्शन पार्टीत गब्बरचा रॉयल अंदाज; सोफीसोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 18:11 IST

Open in App
1 / 8

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर शिखर धवन याने आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. घटस्फोटानंतर आयुष्यात आलेली आयरिश ब्युटी सोफी शाइनसोबत त्याने लग्नगाठ बांधली.

2 / 8

शिखर आणि सोफीचे लग्नाचे फोटो व्हायरल होत असताना आता धवनने आपल्या ब्युटीफुल वाइफसोबतचे रिसेप्शन पार्टीतील काही खास फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

3 / 8

'मेरे दिल विच हम तुम...' या खास कॅप्शनसह शिखर धवन याने सोफीसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.

4 / 8

या फोटोत शिखर धवनचा क्लासिक ब्लॅक सूटमधील रॉयल अंदाज आणि सोफीनं फिकट गुलाबी लेहेंग्यातील लूकसह दोघांच्यातील केमिस्ट्रीची खास झलक पाहायला मिळते.

5 / 8

आऐशा मुखर्जीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सोफीच्या रुपात शिखर धवनच्या रुपात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांवरील प्रेम व्यक्त करून देताना दिसून आले होते.

6 / 8

साखरपुडा आणि लग्नाच्या फोटोनंतर रिसेप्शन पार्टीतील दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

7 / 8

शिखर धवनची दुसरी पत्नी सोफीनंही इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून रिसेप्शनसाठी नटलेले काही खास फोटो शेअर केले आहेत.

8 / 8

सोफी शिखर धवनसाठी चीअर लीडर झाल्याचेही पाहायला मिळाले होते. गब्बरनंही आपल्या ब्युटीवर भर मैदानात प्रेम व्यक्त करून नात्यातील गोडवा दाखवून दिला होता.

टॅग्स :शिखर धवनऑफ द फिल्डव्हायरल फोटोज्