IPL 2025 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर इंग्लंडमध्येही दमदार खेळ करत आहे. इंट्रा स्क्वाड सामन्यात त्याने दमदार शतक ठोकून आपली दावे मजबूत केली.
टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. यापूर्वी शार्दुल ठाकूरने शतक ठोकून प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान जवळजवळ निश्चित केले असल्याचे बोलले जात आहे.
शार्दुलला टीम इंडियात कायमस्वरूपी स्थान मिळालेले नाही. पण त्याची पत्नी मिताली नेहमीच त्याला पाठिंबा देत असते. मिताली दिसायलाही सुंदर आहेत. तसेच ती एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे.
१९९२ मध्ये मुंबईत जन्मलेली मिताली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ७० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती इन्स्टाग्रामवर शार्दुल ठाकूरसोबतचे तिचे फोटो पोस्ट करत असते.
शार्दुल ठाकूर आणि मिताली पारुलकर यांचा २०२१ मध्ये साखरपुडा, तर फेब्रुवारी २०२३ लग्न झाले. दोघेही बालपणीपासून एकमेकांना ओळखतात. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि ते विवाहबद्ध झाले.
मिताली ही बेकरीचा व्यवसाय करते. तिचे ऑल जाझ बेकरी नावाचे एक स्टोअर आहे. २०२० मध्ये मिताली हा व्यवसाय सुरू केला. या बेकरीमध्ये मिताली अनेक प्रकारचे केक, कुकीज, ब्रेड आणि बन विकते.
एका अहवालाच्या माहितीनुसार, या व्यवसायातून तिने सुमारे २ ते ३ कोटी रुपयांची नेटवर्थ कमावली आहे. मितालीचे वडील एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत तिने हा मार्ग निवडला आहे.