शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या संपत्तीचे हिस्सेदार जाहीर! बायको-प्रेयसीला दमडीही नाही दिली, अनोळखी लोकांना केले श्रीमंत

शेन वॉर्नचा गेल्या वर्षी थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.

भारतात शेन वॉर्नची फॅन फॉलोइंग मोठी आहे. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नने इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार म्हणून विजय मिळवला आहे. शेन वॉर्नचा गेल्या वर्षी थायलंडमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.

शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली. त्याने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ७०८ विकेट घेतल्या. सहा वेळा अॅशेस जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो भाग होता. याशिवाय वॉर्न १९९९ साली वर्ल्ड कप विजेत्या संघातही होता.

शेन वॉर्नचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादांनी भरलेले असायचे. गर्लफ्रेंड लिझ हर्लीसोबतच्या नात्याचा विषय असो की न्यूड फोटो व्हायरल होण्याचे प्रकरण. या सगळ्याची पर्वा न करता वॉर्नने आपल्या आयुष्याचा भरपूर आनंद लुटला.

शेन वॉर्नचे मृत्यूपत्र समोर आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, वॉर्नने आपल्या मृत्युपत्रात माजी पत्नी सिमोन कॅलाघनला एक पैसाही दिलेला नाही. बराच काळ तो इंग्लिश अभिनेत्री लिझ हर्लीला डेट करत होता. वॉर्ननेही त्याच्या मृत्यूपत्रात हर्लेला काहीही दिलेले नाही.

ऑस्ट्रेलियाच्या सुप्रीम कोर्टाने शेन वॉर्नच्या एकूण संपत्तीचे मूल्यांकन केल्याचे या अहवालात सांगण्यात आले. हे एकूण $20,711,013.27 ( १२० कोटी) असल्याचे आढळले. शेन वॉर्न आणि सिमोन कॅलाघन यांच्या लग्नाला १५ वर्षे झाली होती. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी वॉर्नने आपला हिस्सा त्याच्या माजी पत्नीला पोटगी म्हणून दिला होता. गर्लफ्रेंड लिसा हर्ले हिच्यावर त्याची कोणतीही आर्थिक जबाबदारी नव्हती.

शेन वॉर्नने त्याच्या मालमत्तेतील बहुतेक हिस्सा हा त्याच्या मुलांना दिला आहे. शेन वॉर्नला एकूण तीन मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव जॅक्सन वॉर्न आहे तर दोन मुलींची नावे समर वॉर्न आणि ब्रुक वॉर्न आहेत. या तिघांनाही माजी फिरकीपटूने मृत्यूपत्रात समान ३१ टक्के वाटा दिला आहे.

मृत्यूपत्रात वॉर्नने आपल्या मुलांसोबतच त्याच्या भावाच्या मुलांवरही प्रेमाचा वर्षाव केला आहे. उर्वरित सात टक्के मालमत्तेपैकी वॉर्नने २ टक्के मालमत्ता भाऊ जेसनला दिली. याशिवाय वॉर्नने जेसनच्या दोन मुलांच्या नावे २.५ टक्के मालमत्ता ठेवली आहे.

वॉर्नवर २ लाख ९५ हजार डॉलरचे कर्ज असल्याचेही अहवालात सांगण्यात आले. हे कर्ज क्रेडिट कार्ड आणि थकबाकी असलेल्या घरगुती बिलांच्या स्वरूपात आहे. त्याची BMW, मर्सिडीज बेंझ आणि $375,500 किमतीची यामाहा मोटारसायकल त्याचा मुलगा जॅक्सनला देण्यात आली आहे.