Join us

शाहिद आफ्रिदीने मामे बहिणीसोबत केलंय लग्न, पाच मुलींचा आहे बाप; जाणून घ्या त्याच्या पत्नीचं प्रोफेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:20 IST

Open in App
1 / 5

पाकिस्तान क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या शाहीन आफ्रिदीचे माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न होणार आहे. पण, चर्चा शाहिद आफ्रिदीच्या लग्नाची सुरू झाली आहे.

2 / 5

शाहिद आफ्रिदीने आपल्या मामाच्या मुलीसोबत लग्न केले आहे, म्हणजेच त्याने आपल्या बहिणीला नात्याने पत्नी बनवले आहे. जरी हे त्यांच्या धर्मात घडते. शाहिदने त्याच्या लग्नाबद्दल काही खुलासाही केला होता. शाहिद आफ्रिदीच्या पत्नीचे नाव नादिया आहे, ती एक डॉक्टर आहे.

3 / 5

शाहिद आणि नादियाचे २२ ऑक्टोबर २००० रोजी लग्न झाले होते. आपल्या लग्नाबाबत शाहिदने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा तो घरातून बाहेर पडत असताना त्याने गमतीने वडिलांना त्याचं लग्न करण्यास सांगितले होते. मुलगी शोधू, लग्न करू, असे तो म्हणाला होता.

4 / 5

मात्र तो परत आल्यावर वडिलांनी त्याला लग्नासाठी मुलगी सापडल्याचे सांगितले. वडिलांनी सांगितले की त्यांनी लग्नासाठी नादियाची निवड केली आहे, जिला शाहिद लहानपणापासून ओळखत होता. नादिया ही शाहिद आफ्रिदीच्या मामाची मुलगी आहे.

5 / 5

शाहिद आफ्रिदीने तो पाकिस्तानसाठी २७ कसोटी, ३९८ वन डे व ९८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे १७१६, ८०६४ आणि १४१६ धावा केल्या आहेत. शाहिद आफ्रिदीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये ५४१ विकेट घेतल्या आहेत.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान
Open in App