वीरेंद्र सेहवाग एका मुलीच्या प्रेमात पडला होता.
सात वर्षे या दोघांचे अफेअर सुरु होते.
सेहवागला आपल्या या प्रेयसीबरोबर लग्न करायचे होते, पण घरच्यांना या गोष्टीला कडाडून विरोध होता.
कारण ही मुलगी सेहवागच्या नात्यामध्ये होती. त्यामुळे घरच्यांनी सेहवागला तु या मुलीशी लग्न करू नको, असे सांगितले होते.
सेहवाग मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. मग सेहवागने घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले की त्या मुलीला धोका दिला, असा प्रश्न आता तुमच्या डोक्यामध्ये असेल.
सेहवागने हळूहळू त्याने आपल्या घरच्यांने मन वळवण्याचा प्रयत्न केला.
अखेर सेहवागच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि वीरेंद्रने अखेर आरतीशी लग्न केले.